Mumbai Water Supply : मुंबईकरांना मोठा दिलासा! प्रस्तावित 10 टक्के पाणीकपात रद्द
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे मुंबई शहर व उपनगरातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे मुंबई शहर व उपनगरातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्रांमधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम नियोजनानुसार मंगळवार दिनांक ०७ ऑक्टोबर , बुधवार दिनांक ०८ ऑक्टोबर व गुरुवार दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी दररोज दुपारी १२.३० ते ०३.३० वाजेपर्यंत म्हणजेच अडीच तास केले जाणार होते. त्यापैकी मंगळवार व बुधवारी नियोजित कामकाज सफलतापूर्वक पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, गुरुवार दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी महावितरण कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सदर कामकाज पुढे ढकलण्यात आले आहे.
advertisement
त्यामुळे मुंबई शहर विभागातील ए , बी , एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच पूर्व उपनगरातील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील व पूर्व उपनगरातील एल विभाग (कुर्ला पूर्व ), एन विभागात, विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रातील यापूर्वी प्रस्तावित केलेली १० टक्के पाणीकपात रद्द करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 10:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Water Supply : मुंबईकरांना मोठा दिलासा! प्रस्तावित 10 टक्के पाणीकपात रद्द