फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल, तासाला 615 प्रवासी करतात विनातिकीट प्रवास
- Published by:News18 Marathi
- Reported by:Piyush Patil
Last Updated:
मध्य रेल्वेने रोज 40 लाख प्रवासी प्रवास करतात. यातील अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. तरीही रेल्वेला कोट्यवधींचा महसूल मिळाला
मुंबई: मध्य रेल्वेने दररोज 40 लाख प्रवासी प्रवास करतात. यातील अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. अशा विनातिकीट प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला असून 61 दिवसांत 9 लाखांहून अधिक प्रवाशांवर कारवाई केली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तिकीट नसलेल्या प्रवाशांविरोधात रेल्वेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. लोकल ट्रेन, मेल एक्स्प्रेस आणि स्पेशल ट्रेनमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. यातून रेल्वेने कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे.
दर तासाला 615 विनातिकीट प्रवासी
या कारवाईच्या आलेखानुसार पाहिले तर मध्य रेल्वेवर दर तासाला 615 विनातिकीट प्रवासी पकडले जातात. तिकीट बुकिंगवरील कारवाई हा मध्य रेल्वेच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. मध्य रेल्वेने एप्रिल महिन्यात 4 लाख 29 हजार तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कारवाई केली. या कारवाईतून 27 कोटी 74 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच मे महिन्यात 5 लाख 11 हजार तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
advertisement
मुंबई विभागातून सर्वाधिक दंड
view commentsमध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला 4 लाख 7 हजार प्रकरणांमधून 25 कोटी 1 लाख रुपयांची कमाई झाली. भुसावळ विभागाने 1 लाख 93 हजार प्रकरणात 17 कोटी 7 लाख रुपये दंड वसूल केला आहे. तर नागपूर विभागाने 1 लाख 19 हजार प्रकरणात 7 कोटी 56 लाख रुपये दंड वसूल केला. सोलापूर विभागाने 54 हजार सातशे प्रकरणात 3 कोटी 10 लाख रुपये आणि पुणे विभागाने 83.81 हजार प्रकरणात 6 कोटी 56 लाख रुपये दंड वसूल केला आहे. एकंदरीत कोट्यवधींचा दंड विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडूनन वसूल करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 16, 2024 4:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल, तासाला 615 प्रवासी करतात विनातिकीट प्रवास


