मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी, बिअर कॅन हातात घेतल्याचे फोटो

Last Updated:

मुंबईतल्या प्रसिद्ध वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचे फोटो समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी
मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध आणि इतिहासाशी साक्ष देणाऱ्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी पोस्ट केला होता. आता त्याच पार्टीमधील इतर काही फोटो सामोर आले आहेत.
या फोटोजमध्ये लोकांच्या हातात बिअरचे कॅन दिसून येतायत. ठाकरे गट या प्रकरणावर चांगलाच आक्रमक झाला असून स्थानिक आमदार आशिष शेलारांवर निशाणा साधला आहे. तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनाही अखिल चित्रे यांनी सुनावले आहे.
गडकिल्ल्यावर दारू पार्टी होत असताना सरकार कुठे आहे? सरकारची काही सुरक्षा यंत्रणा व्यवस्था आहे की नाही? सरकार काय झोपले आहे का? असा प्रश्नांची सरबत्ती शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी केली.
advertisement
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम वांद्रे किल्ल्यावर दाखल झाली आहे. पोलीस सीसीटीव्ही तपासत असून किल्ल्यावर दारू पार्टी करणाऱ्या तरुणांचा शोध घेतला जात आहे. दोषींना लवकरच पकडण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
advertisement

आखिल चित्रे यांची एक्सवरील पोस्ट

महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महापालिका परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर 'महाराष्ट्र पर्यटन' विभाग ? नक्की काय सुरु आहे ? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे सोकॉल्ड 'सांस्कृतिक मंत्री' आशिष कुरेशी?
advertisement
सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे... हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती !
(व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी, रविवारी रात्री उशिरा, १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री काढलेला आहे.)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी, बिअर कॅन हातात घेतल्याचे फोटो
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement