ड्रग्ज व्यसनीचा तरुणावर हल्ला, कात्रीचा डोक्यात खोलवर घाव, चाकूने भोसकले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुंबईतील दहिसर भागात अंमली पदार्थाची नशा करणाऱ्या एकाने तरुणावर गंभीर हल्ला केला.
विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील दहिसर पूर्वेकडील रावळपाडा शनी मंदिराजवळून चालत असलेल्या एका तरुणावर ड्रग्ज व्यसनीने अचानक चाकू आणि कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला
जखमींवर चाकूचा वार खूप खोल असल्याचे सांगितले जात आहे. आणि कात्रीने तरुणाच्या डोक्यात घुसून रक्तस्त्राव झाला. जखमी व्यक्तीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींचा शोध घेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 5:27 PM IST









