मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांचा राजीनामा, ठाकरेंना धक्का, भाजप नेत्यांच्या भेटीगाठींना सुरुवात
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी राजीनामा दिला आहे. राऊळ यांच्या राजीनाम्याने महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.
मुंबई : महापालिका निवडणुकीला रंग चढायला सुरुवात झालेली असतानाच आणि प्रत्यक्ष मतदानाला अगदी १० दिवस बाकी असताना मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी राजीनामा दिला आहे. राऊळ यांच्या राजीनाम्याने महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. काही कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चा सुरू आहेत.
शुभा राऊत यांनी राजीनामा देताना काय म्हटले?
मी, शुभा उमेश राऊळ, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांवर आणि आपल्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून मनापासून शिवसेनेत कार्यरत राहिले आहे. तथापि, काही कारणास्तव मला शिवसेना अंतर्गत शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्ष या पदाचा तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे, याची नोंद घ्यावी. आपणा सर्वाकडून मिळालेल्या आजपर्यंतच्या सहकार्याबद्दल मी आभार व्यक्त करत आहे, असे शुभा राऊळ राजीनामा देताना म्हणाल्या.
advertisement
कोण आहेत शुभा राऊळ?
शुभा राऊळ ३३ महिने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर होत्या. महाराष्ट्र सरकारच्या कोविड-१९ आयुष टास्क फोर्सच्या सदस्या होत्या. १० मार्च २००७ रोजी त्या महापौरपदी निवडून आल्या होत्या. मुंबईच्या तिसऱ्या महिला महापौर होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. दहिसर भागाचे प्रतिनिधित्व राऊळ यांनी केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 4:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांचा राजीनामा, ठाकरेंना धक्का, भाजप नेत्यांच्या भेटीगाठींना सुरुवात









