कुख्यात गुंड गजा मारणेचा पुण्यात येण्याचा मार्ग मोकळा, हाय कोर्टाचा मोठा निर्णय
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मारणेला येत्या १५ आणि १६ जानेवारी रोजी पुणे शहरात येण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. पुणे महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या दोन्ही दिवशी गजा मारणे पुण्यात उपस्थित राहू शकणार आहे.
गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे या पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. आपल्या पत्नीला निवडणुकीत मदत करण्यासाठी आणि मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपल्याला शहरात येण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज गजा मारणेने मुंबई उच्च न्यायालयात केला होता. यापूर्वी स्थानिक सत्र न्यायालयाने मारणेला शहरात येण्यावर बंदी घातली होती. मात्र, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय अंशतः बदलत त्याला दोन दिवसांची मुदत दिली आहे.
advertisement
उच्च न्यायालयाने गजा मारणेला पुण्यात येण्याची परवानगी दिली असली, तरी त्यावर अत्यंत कडक अटी लादल्या आहेत. मतदारांवर प्रभाव टाकण्यास बंदी घातली आहे. मारणे पुण्यात आला तरी त्याने मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा प्रभाव टाकू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तरी मारणेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची आणि तो निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणार नाही, याची खबरदारी पोलीस प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.
advertisement
गजा मारणे हे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील एक मोठं नाव आहे. त्याच्यावर 'मकोका'सारख्या गंभीर कलमांखाली कारवाई झालेली आहे. अशा परिस्थितीत, निवडणुकीच्या दिवशी त्याच्या पुण्यातील उपस्थितीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विशेषतः कोथरूड आणि आसपासच्या परिसरात जिथे मारणेचा प्रभाव मानला जातो, तिथे पोलिसांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 2:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुख्यात गुंड गजा मारणेचा पुण्यात येण्याचा मार्ग मोकळा, हाय कोर्टाचा मोठा निर्णय









