ठाकरेंचा सैनिक शिंदेगटात, ज्येष्ठ शिवसैनिक संतापला, भेट दिलेली बॅग पेटवत म्हणाला- गद्दारांना जागा दाखवा

Last Updated:

अनिल कोकीळ यांनी भेट दिलेली बॅग आणि साहित्य ज्येष्ठ शिवसैनिकाने जाळून टाकत निषेध व्यक्त केला.

अनिल कोकीळ शिंदे गटात प्रवेश
अनिल कोकीळ शिंदे गटात प्रवेश
मुंबई : शिवसेनेच्या जन्मापासून ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेल्या लालबाग परळमध्ये यंदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी मंगळवारी दुपारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांना लगोलग एबी फॉर्मही मिळाला. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांच्या हस्ते त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. कोकीळ यांच्या प्रवेशाने प्रभागातील ज्येष्ठ शिवसैनिक संतापले होते.
अनिल कोकीळ यांनी भेट दिलेली बॅग आणि साहित्य ज्येष्ठ शिवसैनिकाने जाळून टाकत निषेध व्यक्त केला. गद्दाराला हाकलवून द्या, त्याला कुठेही उभा करू नका, त्याला त्याची जागा दाखवा, असे म्हणत लालबाग येथील ज्येष्ठ शिवसैनिकाने संताप व्यक्त केला.
अनिल कोकीळ यांना प्रभाग क्रमांक २०२४ मधून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला. आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत कोकीळ यांनी धनुष्यबाण हाती घेतले. आज दुपारी त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.
advertisement

कोकीळ यांच्या नावावर फुली मारून ठाकरेंकडून किरण तावडे यांना उमेदवारी

प्रभाग क्रमांक २०४ मध्ये अनिल कोकीळ यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी किरण तावडे यांना उमेदवारी दिल्याने कोकीळ नाराज झाले होते. प्रभाग क्रमांक २०४ मधून अनिल कोकीळ यांनी उमेदवारी मागितली होती. सुरुवातीच्या त्यांच्या नावाची चर्चाही झाली. परंतु ऐनवेळी कोकीळ यांच्या नावावर फुली मारून उद्धव ठाकरे यांनी किरण तावडे यांना उमेदवारी दिली.
advertisement

लालबागमध्ये तावडे विरुद्ध कोकीळ यांच्यात फाईट!

अनिल कोकीळ यांनी शेवटच्या क्षणी पक्षांतर केल्याने आणि त्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारीही मिळाल्याने यंदा लालबागमधील लढाई अतिशय निकराची होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून किरण तावडे विरुद्ध शिंदेसेनेकडून अनिल कोकीळ यांच्यात तगडी लढत होईल. मुंबईतील ही लढत लक्षवेळी लढतींपैकी एक असेल. लालबाग हा परिसर मराठी बहुल आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने पक्षाचे तिकीट असेल तर उमेदवार जिंकून येतोच असा येथील अनुभव आहे. परंतु पक्षात फूट पडल्यानंतर ताकद विभागली गेली आहे. पक्षाकडून माझ्यावर अन्याय झाल्याने शिंदसेनेत प्रवेश केल्याचे कोकीळ यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाकरेंचा सैनिक शिंदेगटात, ज्येष्ठ शिवसैनिक संतापला, भेट दिलेली बॅग पेटवत म्हणाला- गद्दारांना जागा दाखवा
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement