Dasara 2025: देवीच्या मूर्तींचं विसर्ज कृत्रिम तलावांतच, कशी आहे महापालिकेची व्यवस्था?

Last Updated:

Dasara 2025: देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे.

Dasara 2025: देवीच्या मूर्तींचं विसर्ज कृत्रिम तलावांतच, कशी आहे महापालिकेची व्यवस्था?
Dasara 2025: देवीच्या मूर्तींचं विसर्ज कृत्रिम तलावांतच, कशी आहे महापालिकेची व्यवस्था?
मुंबई: शारदीय नवरात्रौत्सवाचा आज (2 ऑक्टोबर) शेवट होत असून ठिकठिकाणी देवीच्या मूर्ती आणि घटांचं विसर्जन होणार आहे. देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे. 24 वॉर्डांतील मंडळांच्या देवींच्या मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेनं 53 कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. 8 नैसर्गिक स्थळांवर देखील विसर्जनाची व्यवस्था भाविकांना करून दिली गेली आहे.
गणेशोत्सवाच्या तुलनेत नवरात्रौत्सवात यंत्रणांवर ताण कमी असतो. नवरात्रौत्सव कालावधीत विसर्जनाच्या सुविधेतर्गत वीज, विसर्जनासाठी बोट आदी सुविधा महानगरपालिकेकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विसर्जन स्थळावर महापालिकेकडून निर्माल्य कलश, प्रकाश व्यवस्था, सफाई कर्मचारी, विसर्जनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ यांचा पुरवठा केला आहे. या शिवाय प्रथमोपचार, रुग्णवाहिका यासाठी ही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
advertisement
यंदा गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच पर्यावरणपूरक मूर्ती विरुद्ध पीओपीच्या मूर्तींचा वाद थेट कोर्टात गेला होता. त्यावेळी 6 फुटापर्यंतच्या सर्वच मूर्ती कृत्रिम तलावात तर 6 फुटांवरील सर्वच मूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करण्यात याव्यात, असे निर्देश कोर्टाने दिले होते.
advertisement
त्यानुसार पालिकेकडून शहर आणि उपनगरांतील सर्व वॉर्डात मिळून 290 कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली होती. त्यामुळे यंदा 98 टक्के गणेशमूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात झालं. परिणामी नैसर्गिक जलस्रोतांचं होणारं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी झालं. नवरात्रौत्सवासाठीही पालिकेकडून कृत्रिम तलाव आणि त्याजवळ विसर्जनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dasara 2025: देवीच्या मूर्तींचं विसर्ज कृत्रिम तलावांतच, कशी आहे महापालिकेची व्यवस्था?
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement