Mumbai News : गुंडांची धिंड की पाहुणचार! माज उतरवायला गेलेल्या आरोपींना पोलिसांकडून स्पेशल ट्रिटमेंट? पाहा VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पोलिसांनी दोन सराईत गुंडांना अटक करून आज त्यांची बोरीवलीमध्ये धिंड काढली होती.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.त्यामुळे हा व्हिडिओ पाहता गुंडांची ही धिंड आहे की पाहूणचार आहे? असा सवाल सर्वसामान्य नागरीक उपस्थित करत आहेत.
Mumbai News : मुंबईच्या उपनगरातील बोरीवलीमध्ये काही दिवसांपूर्वी एका भाजी विक्रेत्याची सराईत गुंडांनी भरदिवसा मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी दोन सराईत गुंडांना अटक करून आज त्यांची बोरीवलीमध्ये धिंड काढली होती.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.त्यामुळे हा व्हिडिओ पाहता गुंडांची ही धिंड आहे की पाहूणचार आहे? असा सवाल सर्वसामान्य नागरीक उपस्थित करत आहेत.
गेल्या 30 जुलैला बोरीवलीच्या गोराई परिसरातील भाजी मंडईत एका भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. दोन सराईत गुन्हेगारांनी ही मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला होता.त्यामुळे भाजी विक्रेत्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अक्षय पाटील आणि सागर पाटील या दोन तरूणांना अटक केली होती. या दोन्ही आरोपींवर गोराई परिसरात दहशत पसरवण्याचा आणि खंडणी वसूल करण्याचा आरोप होता.
advertisement
गुंडांची धिंड म्हणावी की पाहुणचार? व्हिडिओ पाहून तुम्हीच सांगा pic.twitter.com/GhZHM7A5ec
— News18Lokmat (@News18lokmat) August 8, 2025
या आरोपींची दहशत कमी करण्यासाठी आणि माज उतरवण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत आरोपी मस्त पोलिसांसोबत गप्पा टप्पा मारत चालताना दिसत आहेत. आणि आरोपी कमी मित्र असल्यासारखे वाटतायत. तसेच दोन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर मोठं हास्य आहे.तसेच आपण केलेल्या गुन्ह्याचा थोडा देखील पश्चाताप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे.त्यामुळे ही धिंड आहे की पाहूणचार असा सवाल आता नागरीक उपस्थित करत आहेत.
advertisement
नेमकी घटना काय?
पोलिसांनी एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार पिडीत 53 वर्षीय भाजी विक्रेता हा गेल्या 4 वर्षापासून बोरीवलीच्या गोराईत भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा. नेहमीप्रमाणे तो सकाळी भाजीविक्री करत असताना एक इसम त्याच्याजवळ आला आणि त्याने मला फुलविक्री करायची आहेत, तु दुसरीकडे धंदा लाव असे सांगितले. त्यानंतर पीडित भाजी विक्रेत्याने मला मी 4 वर्षापासून इथे भाजीविक्री करतो त्यामुळे तु दुसरीकडे जाऊन फुल विकं, असे सांगताच तो फुल विक्रेता निघून गेला.
advertisement
यानंतर फुलविक्रेता त्याच्यासोबन दोन जणांना घेऊन आला आणि त्याने पिडिताची भाजी फेकून दिली. त्यानंतर त्यांच्यातील एका तरूणाने भाजी विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी देत वजन काटा उचलून त्याच्या खांद्यावर मारला. त्यानंतर भाजेविक्रेत्याच्या पाठीवर प्लास्टीक कॅरेटनेही मारहाण करण्यात आली.साधारण दोन-तीन जण मिळून एकट्या भाजीविक्रेत्याला मारहाण करत होते. यानंतर भाजी विक्रेत्याने देखील हात बुक्क्यांनी हल्ला सूरू केला होता. या घटनेमुळे जागेवरून मोठा राडा झाला होता.
advertisement
बोरिवली (प.)गोराई परिसरात एका भाजी विक्रेत्याला अमानुषपणे मारहाण झाली आहे.संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात याआधीही एमएचबी पोलीस ठाणे,बोरिवली पोलीस ठाणे व आरे कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत कृपया तातडीने कारवाई करावी.@MumbaiPolice @DcpZone11Mumbai @CPMumbaiPolice pic.twitter.com/kHqSQHcG0Z
— Shiva Shetty ( Modi Ka Parivar ) (@ShivanShetty) July 30, 2025
advertisement
यावेळी घटनास्थळी असलेल्या अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केला होता. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल होताच युवकांनी पळ काढला होता.याप्रकरणी भाजी विक्रेत्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून गोराई परिसरात दहशत पसरवण्याचा आणि खंडणी वसूल करण्याचा आरोप असलेल्या अक्षय पाटील आणि सागर पाटील यांच्याविरुद्ध मुंबई बोरिवली पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न, दंगल आणि हल्ला या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक झाली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2025 9:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai News : गुंडांची धिंड की पाहुणचार! माज उतरवायला गेलेल्या आरोपींना पोलिसांकडून स्पेशल ट्रिटमेंट? पाहा VIDEO