सरकारी कर्मचाऱ्यांनो, ही चूक करू नका, अन्यथा होईल मोठी कारवाई, काय आहे आदेश?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सरकारी कर्माचाऱ्यांसाठी एक महत्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. जर या आदेशाचे पालन न केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश नेमका कोणता आहे?हे जाणून घेऊयात.
मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर 16 जानेवारी 2026 ला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.या निवडणुकीला आता जवळपास 20-19 दिवस उरले असताना सरकारी कर्माचाऱ्यांसाठी एक महत्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. जर या आदेशाचे पालन न केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश नेमका कोणता आहे?हे जाणून घेऊयात.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ पासून सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची तारीख, वेळ व ठिकाण याची माहिती संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वतंत्रपणे कळविण्यात आली आहे. या प्रशिक्षणास उपस्थित राहणे अधिकारी, कर्मचारी यांना बंधनकारक आहे.
advertisement
प्रशिक्षणात अनुपस्थित राहणाऱ्या किंवा आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार, फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच, शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया व निकाल जाहीर करण्यात येईल.
advertisement
महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व टप्प्यांचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या मतदान केंद्राध्यक्ष (PRO), सहायक मतदान केंद्राध्यक्ष (APRO), मतदान अधिकारी (PO) आणि कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याने महानगरपालिका प्रशासनामार्फत विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
हे प्रशिक्षण सत्र सोमवार दिनांक २९ डिसेंबर २०२५ पासून सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये प्रशिक्षण राबविले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, आचारसंहिता, मतदान व मतमोजणी प्रक्रिया, कायदेशीर बाबी तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे कोणतीही त्रुटी, गोंधळ किंवा गैरप्रकार टाळून निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व पारदर्शक ठेवणे हा आहे.
advertisement
प्रशिक्षणाची तारीख, वेळ व स्थळ याची माहिती संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वतंत्र नियुक्ती आदेशाद्वारे कळविण्यात आली आहे. या प्रशिक्षणास उपस्थित राहणे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बंधनकारक आहे. कोणत्याही कारणास्तव अनुपस्थिती मान्य केली जाणार नाही.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, प्रशिक्षण सत्रात अनुपस्थित राहणाऱ्या,आदेशांचे पालन न करणाऱ्या किंवा निवडणूक प्रक्रियेतील कर्तव्ये पार पाडण्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम २८ (क) अन्वये फौजदारी कारवाईसह शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असा कठोर इशारा महानगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात येत आहे. सदर बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडावी, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 7:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सरकारी कर्मचाऱ्यांनो, ही चूक करू नका, अन्यथा होईल मोठी कारवाई, काय आहे आदेश?









