advertisement

दारू पिऊन वहिनीला शिवीगाळ, भावाला राग अनावर, छोट्या भावाला जागेवर संपवलं

Last Updated:

Nagpur Crime: नागपुरातील बेलतरोडी पोलिस स्टेशन हद्दीतील खापरी पुनर्वसन भागत राहणाऱ्या सख्ख्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावाच्या गळ्यावर चाकूचा वार करून त्याला ठार केले.

सख्ख्या भावाने खून केला
सख्ख्या भावाने खून केला
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी, नागपूर : दारू पिऊन मोठ्या भावाच्या पत्नीला शिवीगाळ करण्याच्या वादातून सख्ख्या मोठ्या भावाने लहान भावाच्या गळ्यावर चाकूचा वार करून जीवनिशी ठार केल्याची घटना नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून वैभव जुमडे असे मृतकाचे नाव आहे. तर हरीश जुमडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नागपुरातील बेलतरोडी पोलिस स्टेशन हद्दीतील खापरी पुनर्वसन भागात राहणाऱ्या सख्ख्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावाच्या गळ्यावर चाकूचा वार करून त्याला ठार केले. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हरीशने आपल्या कृत्याची कबुली दिली.
वैभवला दारू पिण्याची सवय होती. त्याच्या या सवयीचा कुटुंबियांना नेहमी त्रास होत असे. त्यामुळे दोघा भावांमध्ये नेहमी वाद होत असे. शनिवारी दुपारी वैभव दारू पिऊन घरी आला असता त्याने हरीशच्या मुलांना आणि पत्नीला शिवीगाळ केली. मोठ्या भावाने (हरीश) विचारणा केली असता त्याने वैभवने त्याला थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
वैभवने केलेल्या शिवीगाळीचा राग आल्याने आरोपी हरीशने छोट्या भावाच्या गळ्यावर चाकूचा वार केला, यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. मी माझ्या भावाची हत्या केली आहे, असे त्याने पोलिसांना जाऊन सांगितले. पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करत हरीश जुमडे याला अटक केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दारू पिऊन वहिनीला शिवीगाळ, भावाला राग अनावर, छोट्या भावाला जागेवर संपवलं
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement