अहमदाबाद-मुंबईनंतर नागपुरात विमानातं इमर्जन्सी लॅण्डिंग, धक्कादायक कारण समोर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. विमानात 157 प्रवासी होते.
अहमदाबाद मुंबईनंतर आता आणखा एका विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरमध्ये या विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर तातडीनं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं आहे. विमानात 157 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 2706 या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानाची नागपूर येथे आपत्कालीन लॅण्डिंग करण्यात आली.
ही फ्लाइट सकाळी 9:20 मिनिटांनी कोचीहून रवाना झाली होती. सध्या नागपूर विमानतळावर पोलीस, बॉम्ब शोध पथक आणि अग्निशमन दल पोहोचले असून संपूर्ण विमानाची कसून तपासणी केली जात आहे. विमान सुमारे वीस मिनिटांपूर्वी नागपूर विमानतळावर उतरलं. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही, अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सर्व दक्षता घेण्यात आली आहे. अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच विमान पुढील प्रवासासाठी रवाना होईल. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा उपस्थित आहेत. विमान सुमारे वीस मिनिटांपूर्वी नागपूर विमानतळावर उतरलं. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही, अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
June 17, 2025 12:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अहमदाबाद-मुंबईनंतर नागपुरात विमानातं इमर्जन्सी लॅण्डिंग, धक्कादायक कारण समोर