त्यांच्या खिशात देशी कट्टा आणि जिवंत काडतूस... पोलिसांना खबर लागली, दोघांना बेड्या
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असते. अशाच दोन आरोपींना अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी नागपूरच्या कळमना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नागपूर : देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूसे घेऊन वस्तीत फिरणाऱ्या दोन आरोपींना कळमना पोलिसांनी अटक केली तर रेकॉर्डवरील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दीड लाखांच्या आसपास मुद्देमाल जप्त केला आहे.
कळमना पोलीस स्टेशन पथक रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की नवीन आर.टी.ओ. कार्यालय जवळ, चिखली येथे दोन इसम अग्नि शस्त्रासह येणार आहे. अशा माहितीवरून त्या ठिकाणी सापळा रचुन एका पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून आलेल्या इसमांचा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.
आरोपींची विचारपूस केली असता सोनु त्रिवेदी, सहदेव शाहु असे दोन आरोपी मिळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता खिशात एक देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुस मिळुन आले. आरोपीचे ताब्यातून देशी कट्टा, दोन जिवंत काडतुस आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन मोपेड असा एकूण किंमती एक लाख ४० हजार रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक केली असून एका कुख्यात आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
June 26, 2025 10:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
त्यांच्या खिशात देशी कट्टा आणि जिवंत काडतूस... पोलिसांना खबर लागली, दोघांना बेड्या


