मृत्यूला जिंकणारा माणूस! 4 वेळा अपघात, 108 फ्रॅक्टर अन् 110 टाके, अंगावर काटा आणणारा संघर्ष
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नागपुरातील श्रीकांत गुरव यांच्यासाठी जीवन म्हणजे अपघातांची मालिका झाले आहे. मात्र, त्यावर मात करून ते जिद्दीने उभे आहेत.
नागपूर, 26 ऑक्टोबर: 'अपयश ही यशाची पहिली पायरी असते' हा सुविचार आपण अगदी शालेय जीवनापासून वाचत अथवा ऐकत आलो आहे. मात्र एखाद्याच्या वाट्याला कितपत अपयश यावे आणि नियतीने किती परीक्षा घ्यावी हा मोठा प्रश्न आहे ? नागपुरातील एका व्यक्तीच्या जीवनात जणू संकटांची मालिकाच निर्माण झाली. आयुष्याच्या लहानशा प्रवासात एक दोन नव्हे तर तब्बल 4 वेळा अपघात झाला. त्यात 108 फॅक्चर, 110 टाके आणि 60 टक्के अपंगत्व आले. तरी देखील श्रीकांत गुरव हे परिस्थितीला धैर्याने सामोरे जात पुन्हा उभं राहिले. त्यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
श्रीकांत गुरव यांनी एकदोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा मृत्यूच्या दाढेतून आपली सुखरूप सुटका करून घेतली. संकट केवळ जीवावर बेतणार नव्हतं तर मनाची आणि हिमतीची परीक्षा घेणारं होतं. अनेकदा बाका प्रसंग देखील श्रीकांत यांच्या आयुष्यात आला होता. घरातील अनेकांचे आकास्मित मृत्यू, कर्जबाजारी झाल्यामुळे ज्वेलरी शॉपही बंद, जबाबदारींचे प्रचंड ओझे. असे अनेक संकट त्यांच्या मागे होते. मात्र खचून न जाता परिस्थितीशी चार हात करीत श्रीकांत पुन्हा उभा राहिले. संसार सांभाळला आणि आज ताठ मानेने जगत आहेत.
advertisement
अपघातांची मालिका
माझं शिक्षण एम. ए. सायकॉलॉजी, सायबर लॉमध्ये डिप्लोमा आणि ज्वेलरी मेकिंगचा कोर्स केला आहे. माझा स्वतःचा ज्वेलरीचा व्यवसाय होता. सारं सुरळीत सुरू होतं. मात्र 2011 मध्ये माझा पहिला एक्सीडेंट झाला. त्यानंतर एका पाठोपाठ एक माझे चार एक्सीडेंट झाले. त्यात पहिला एक्सीडेंट मध्ये डावा भाग पॅरालिसिस झाला, मानेच्या मणक्यात पाच ठिकाणी मोठी दुखापत झाली. त्यानंतर लगेचच तीन महिन्यात देवाची कृपा झाली आणि मी आजारातून बऱ्यापैकी बाहेर पडलो.
advertisement
संकाटामागून संकटे
हे थोडे की काय की 2014 सली ज्वेलरीचे दुकान दीड कोटीच्या कर्जापाई बंद पडले. कालांतराने 2015 साली माझे लग्न झाले आणि लग्नाच्या पाच महिन्यानंतरच माझा पुन्हा एक्सीडेंट झाला. या अपघातात 108 फ्रॅक्चर आणि 110 टाके मला लागले. बराच कालावधीनंतर त्यातून मला सावरायला वेळ मिळाला. होतं नव्हतं ते सर्व आजारात निघून गेलं. म्हणून पुढे उदरनिर्वाहासाठी माझ्या मित्राच्या सहकार्याने नागपुरातील सेमिनरी हिल्स येथे फूड लॉगिन नावाने मी माझा व्यवसाय सुरू केला. काळानुरुप लोकांची देखील त्याला पसंती मिळत गेली. सारे सुरळीत सुरू होतं. या व्यवसायात माझी पत्नी देखील मला सहकार्य करत होती, अशी माहिती श्रीकांत यांनी दिली.
advertisement
जगण्याची जिद्द कायम
फूड व्यवसाय व्यवस्थित सुरू असतानाच आठ महिन्यांनी पुन्हा एक मोठा एक्सीडेंट झाला. ज्यामध्ये बॉडी मधील न्यूरो पेन, कानाची श्रवण क्षमता गेली. या अपघाताचा माझ्या व्यवसायावर देखील मोठा परिणाम झाला. हे थोडे की काय या अपघातातून सावरत असतानाच पुन्हा आठ महिन्यांनी माझा चौथा सिव्हियर एक्सीडेंट झाला. ज्यामध्ये पाठीला आणि छातीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. छोट्याशा आयुष्यात तब्बल चार वेळा माझे मोठे अपघात होऊन मी त्यावर जिद्दीने पुन्हा उभा राहून माझा व्यवसाय सुरू केला आहे, असे श्रीकांत सांगतात.
advertisement
या अपघातांमुळे आज घडीला माझ्या शरीरात 60 टक्के अपंगत्व आले आहे. आयुष्याच्या घनघोर खिंडीत असंख्य संकटे येत राहतील. या प्रवासात मी कधीही माझ्यातली जिद्द आणि मेहनत सोडली नाही आणि पुढे देखील सोडणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे, असे मत श्रीकांत गुरव यांनी बोलताना व्यक्त केले.
अनेक संकटांवर मात
view commentsअनेक संकटांवर मात करून जिद्दीनं आपलं विश्व निर्माण करणारा संघर्षयोद्धा म्हणून श्रीकांत गुरव यांची ओळख आहे. आजघडीला श्रीकांत फूड लॉगिन नावाने एक व्यवसाय करतात. मृत्युच्या दारातून अनेकदा पारलेल्या श्रीकांत यांना त्यांची पत्नी अश्विनी गुरुव ही देखील सहकार्य करते. आज त्यांच्या स्टॉलवर 50 हून अधिक मेनू मिळत असून त्यांच्या या संघर्षाची कहाणी साऱ्यानांच प्रेरणा देणारी आहे. श्रीकांत गुरव यांचा प्रवासा जितका प्रेरणादायी आहे तितकाच त्यांच्या स्टॉल वरील मेनूची चव देखील भन्नाट आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 26, 2023 11:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
मृत्यूला जिंकणारा माणूस! 4 वेळा अपघात, 108 फ्रॅक्टर अन् 110 टाके, अंगावर काटा आणणारा संघर्ष

