भाजप उमेदवार अन् कार्यकर्त्यांकडून पोलिसाला बेदम मारहाण, नागपुरातील धक्कादायक घटना

Last Updated:

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला भाजपच्या नगरपरिषद उमेदवारासह १० ते १२ कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

News18
News18
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला भाजपच्या नगरपरिषद उमेदवारासह १० ते १२ कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना डिगडोह देवी परिसरातील एका सोसायटीत घडली असून, यामुळे नागपूरच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजप उमेदवारासह कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या पोलीस शिपायाचे नाव वृषभ भातुलकर असून, त्यांच्यावर भाजपचे नगर परिषद उमेदवार अनिल शर्मा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आरोपींनी जीवघेणी धमकी देत मारहाण केली. तसेच शिवीगाळ देखील केली, असं भातुलकरांनी तक्रारीत म्हटलं आहे.

डीजेच्या आवाजावरून झाला वाद

advertisement
ही घटना २४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. पोलीस शिपाई भातुलकर ड्युटीवरून घरी परतले होते. त्यावेळी त्यांच्या सोसायटीत भाजप कार्यकर्त्यांच्या घरी डीजे (DJ) मोठ्या आवाजात सुरू होता. भातुलकर यांनी सोसायटीचे सचिव अभयकुमार दास यांना या आवाजाबद्दल विचारणा केली. कारण, काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसावेळी डीजेचा आवाज बंद करण्यासाठी याच सचिवाने दडपशाही केली होती. या भेदभावाबद्दल त्यांनी विचारताच, त्यांना खाली बोलावून घेण्यात आले.
advertisement

“यही है ओ!” म्हणत भाजप उमेदवाराकडून मारहाण

भातुलकर खाली पोहोचताच, भाजपचे उमेदवार अनिल शर्मा यांनी 'यही है ओ!' असे म्हणत त्यांच्या कॉलरला पकडले. त्यानंतर त्यांना चापटी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप भातुलकर यांनी केला आहे. अनिल शर्मा यांच्यासोबतच अभयकुमार दास, शरद शर्मा, साजन शर्मा, अजय पाठक यांच्यासह दहा ते बारा भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकट्या पोलीस शिपायावर हल्ला चढवला.
advertisement

भांडण सोडवणाऱ्या पत्नीलाही धक्काबुक्की

या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलीस शिपाई भातुलकर यांच्या पत्नीला देखील भाजप उमेदवार अनिल शर्मा यांनी ढकलून जमिनीवर पाडल्याचा गंभीर आरोप आहे. या संपूर्ण प्रकारामुळे सोसायटीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या गंभीर प्रकरणाची तक्रार MIDC हिंगणा शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपच्या उमेदवाराने पोलीस शिपायालाच मारहाण झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या प्रकरणी पोलीस आणि प्रशासनाकडून नेमकी काय कठोर कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
भाजप उमेदवार अन् कार्यकर्त्यांकडून पोलिसाला बेदम मारहाण, नागपुरातील धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement