Nanded News: सक्षमची हत्या 'ज्या' दिवशी झाली त्या दिवसाचं CCTV समोर, नेमकं घराबाहेरच्या गल्लीत काय घडलं?

Last Updated:

सक्षमच्या हत्येच्या दिवशी दोन तरुणांनी रेकी केली असून याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

News18
News18
Nanded Crime News : नांदेडच्या सक्षम ताटे हत्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. मृत सक्षमची प्रेयसी असलेल्या आंचलने (Anchal Mamidwar) आपल्याच वडिलांविरुद्ध साक्ष देऊन त्यांच्या फाशीची मागणी केली आहे. तसेच भावांविरुद्ध देखील आंचलने जबाब नोंदवला आहे. त्यामुळे आता नांदेडचं (Nanded Crime) हे प्रकरण अधिकच गंभीर होत असल्याचं पहायला मिळतंय. दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सक्षमच्या हत्येच्या दिवशी दोन तरुणांनी रेकी केली असून याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
नांदेड शहरात आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे या युवकाची हत्या झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जुनागंज भागात घडली. त्याच्या प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक तपासात पोलिसांना अंदाज आला आहे.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसत आहे?

27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सक्षम ताटे जुनागंज परिसरात हत्या करण्यात आली आहे. हत्येच्या दिवशी सक्षमच्या राहत्या घराबाहेर संशयास्पद हालचाल आढळून आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असता महत्वाची माहिती हातात समोर आली आहे. सक्षमच्या घरासमोर हत्या झाल्याच्याच दिवशी दोन संशयित तरुण फिरताना आढळले आहेत. ज्या गल्लीत सक्षमचे घर आहे, त्या गल्लीत दोघे फिरत होते आणि त्यानंतर एकमेकांशी कुजबुज करत चर्चा करतानाही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
advertisement

शहरात विविध ठिकाणी सापळे

दोघेही सक्षमच्या राहत्या घराभोवती फिरत रेकी केल्याचा पोलिसांना ठोस पुरावा मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास आणखी वेगाने सुरू झाला. एक तरुण ताब्यात घेतला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. एक संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. दुसरा तरुण फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त केले आहे. शहरातील विविध ठिकाणी सापळे रचण्यात आले आहे.
advertisement

सक्षमच्या मृतदेहाशी लग्न 

सक्षम ताटे (वय 25) आणि आंचल मामीडवार (वय 21) या दोघांचे प्रेमसंबंध होते. आंतरजातीय प्रेमसंबंधाला आंचलच्या भावाचा आणि वडिलांचा विरोध होता. या विरोधातून आंचलच्या भावाने आणि वडिलांनी मिळून सक्षमला गोळ्या झाडून मारलं, त्याची हत्या केली. ही घटना गुरुवारी घडली. आंचलने या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला अन् सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं अन् प्रेम अजरामर आहे, याची प्रचिती दिली. मी त्याच्या नावाचं कुंकू लावते असं म्हणत तिने आपल्या बापाविरुद्ध एल्गार केला अन् भावासह त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केलीये.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded News: सक्षमची हत्या 'ज्या' दिवशी झाली त्या दिवसाचं CCTV समोर, नेमकं घराबाहेरच्या गल्लीत काय घडलं?
Next Article
advertisement
Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement