advertisement

Nanded : अशोक चव्हाणांना सलग दुसरा धक्का, कुटुंबातला माणूसच करणार बंडखोरी

Last Updated:

पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे. ती भुमिका मला मान्य आहे असं डॉ मिलन खतगावकर म्हणाल्या.

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण
मुजीब शेख, नांदेड : नांदेडचे भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थकांनी देखील काँगेसला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र आता अशोक चव्हाण यांचे अनेक शिलेदार काँगेसमध्ये प्रवेश करत आहेत. जवळचे मित्र डीपी सावंत यांनी साथ सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांना कुटुंबातूनच बंडाचा इशारा मिळाला आहे.  माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सून तथा अशोक चव्हाण यांच्या भाचेसून डॉ मीनल खतगावकर यांनी निवडणुकीपूर्वीच बंड करण्याचा इशारा दिलाय.
डॉ मिलन खतगावकर ह्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघातून इच्छुक आहेत. या मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार राजेश पवार देखील उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. मिनल खतगावकर यांनी एका कार्यक्रमात स्वतःची उमेदवारीच एक प्रकारे घोषित केली. दोन वेळा आम्हाला माघार घ्यावी लागली. 2019 आणि 2024च्या लोकसभेत पक्ष आदेश आम्ही मान्य केला. परंतु आता जर पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे. ती भुमिका मला मान्य आहे असं डॉ मिलन खतगावकर म्हणाल्या.
advertisement
2019 साली माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सोबत त्यांनी काँगेस सोडून भाजपात प्रवेश केला. नंतर 2022 साली पुन्हा काँगेस आणि आता लोकसभेपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी देखील पुन्हा भाजपात प्रवेश केला. लोकसभेसाठी त्यांनी भाजपाकडून उमेदवारी देखील मागितली होती. त्यासाठी मीनल खतगावकर यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता पुन्हा नायगाव मधून त्या उमेदवारी मागत आहेत. मात्र याचं आपल्याला आश्चर्य नाही. त्यांचा डीएनए काँगेसचा आहे. 2019 ला भाजपाची लाट पाहून त्या भाजपात नंतर पुन्हा काँगेस आणि आता पुन्हा त्या भाजपात आल्या. आता नायगाव मधून भाजपाची उमेदवारी मिळणार नाही हे समजल्याने त्या अपक्ष लढण्याची भाषा करत आहेत. त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया नायगावचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी दिली.
advertisement
दरम्यान लोकशाहीत कोणालाही उमेदवारी मागण्याचे अधिकार आहेत. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याची प्रतिक्रीया काँगेसकडून देण्यात आली. मीनल खतगावकर काँगेस मध्ये आल्या तर स्वागत आहे. पक्षनेत्यांची परवानगी , पक्ष नेत्यांना विचारून पक्षात घेऊ असं काँगेस नेते बी. आर. कदम म्हणाले. विशेष म्हणजे सध्या जिल्हा भाजपाची सर्व सूत्रं अशोक चव्हाण यांच्या हाती आहेत आणि त्यांच्याच भाचे सुनेने बंडाचा इशारा दिलाय. अशोक चव्हाण यांच्या परिवारातून बंडाची भाषा केली जात असल्याने हा चव्हाण यांना धक्का मानला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded : अशोक चव्हाणांना सलग दुसरा धक्का, कुटुंबातला माणूसच करणार बंडखोरी
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement