advertisement

पुणे ते नांदेड प्रवास अवघ्या काही मिनिटांत! पुन्हा सुरू होतेय विमानसेवा, महत्त्वाचं अपडेट

Last Updated:

Pune-Nanded Flight : गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली ही सेवा आता पुन्हा सुरु झालेली आहे. मात्र कोणत्या प्रवाशांना हा फायदा होणार आहे ते जाणून घेऊयात.

Pune to Nanded flight service latest update
Pune to Nanded flight service latest update
पुणे : पुणे आणि नांदेड शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नेमका या शहरातील नागरिकांसाठी कोणती सुविधा किंवा कोणता प्रकल्प सुरु केला आहे त्याबाबत नेमकं जाणून घेऊयात.
विमानाचा खोळंबा संपला
नांदेड येथील डीजीसीए यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपूर्वी नांदेड विमानतळावरील विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. विमानतळाच्या धावपट्टीवर खड्डे आढळल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे पुणे-नांदेडसह दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांकडे जाणारी विमानसेवा थांबवण्यात आली होती.
मुख्य रनवेवरील अडचणी
नांदेडमधील गुरुगोविंद सिंगजी विमानतळ येथे मुख्य धावपट्टीवर सुमारे दोन महिन्यांपूर्वी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. या काळात अनेक प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागली.
advertisement
विमानसेवा पुन्हा नियमित
आता विमानतळावरील सर्व देखभाल आणि दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून विमानसेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान स्टार एअरकडून पुणे-नांदेड ही सेवा उडान योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली होती. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. आता नियमित उड्डाणांमुळे व्यवसायिक, शासकीय कामानिमित्त आणि धार्मिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
पुणे ते नांदेड प्रवास अवघ्या काही मिनिटांत! पुन्हा सुरू होतेय विमानसेवा, महत्त्वाचं अपडेट
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement