Nanded : प्रसूतीसाठी आणले रुग्णालयात, बाळ दगावले अन् आईचाही मृत्यू; नातेवाईकांनी फोडला हंबरडा

Last Updated:

सर्व औषधे आणि रक्त तपासण्या बाहेरून कराव्या लागल्या. त्यासाठी 40 ते 45 हजारांचा खर्च करावा लागल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली.

News18
News18
नांदेड, 04 ऑक्टोबर : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरूच आहे.  गेल्या तीन दिवसात ४० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्येही सरकारी रुग्णालयात मृत्यूचा आकडा मोठा आहे. दरम्याना, नांदेडमध्ये एका नवजात बाळासह मातेचाही मृत्यू झाल्याची घटना घडलीय. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,  नांदेडमधील रुग्णालयात 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. पण शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर महिलेची प्रकृती बिघडत गेली आणि आज महिलेचा मृत्यू झाला.
महिलेवर शनिवारपासून उपचार सुरू असताना डॉक्टरांनी उपाचाराबाबत काही माहिती दिली नाही. सर्व औषधे आणि रक्त तपासण्या बाहेरून कराव्या लागल्या. त्यासाठी 40 ते 45 हजारांचा खर्च करावा लागल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली. आज महिलेचा मृत्यू झाला. बाळानंतर आईचाही मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded : प्रसूतीसाठी आणले रुग्णालयात, बाळ दगावले अन् आईचाही मृत्यू; नातेवाईकांनी फोडला हंबरडा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement