advertisement

Nashik Captain Kharat: कॅ. खरातचं धक्कादायक कांड, महिलेसोबतचा आक्षेपार्ह Video, केबिनबाहेर लोकांच्या रांगा-बाबा चाळ्यात गुंग...!

Last Updated:

Ashok Kharat Controversial Video With Women: कॅप्टन अशोक खरात याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अटकेची कारवाई करताना पोलिसांच्या हाताला खरात याचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ लागले आहेत.

अशोक खरात
अशोक खरात
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या सिन्नरमधील कॅ. अशोक खरात याची काळीकृत्ये लोकांसमोर आली आहेत. एका ३५ वर्षीय महिलेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. कॅप्टन अशोक खरात याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कॅप्टन खरात याचा एका महिलेसोबतचा अत्यंत आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. कॅप्टन थोरात याच्या दालनाबाहेर शेकडो लोकांची गर्दी असताना दालनामध्ये एका महिलेसोबत पूजा करण्याचे नाटक करून तो अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करीत असल्याचे दिसून येते.
महिलेच्या तक्रारीनंतर कॅप्टन अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. अनेक राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील महत्त्वाचे लोक खरात याच्याकडे भविष्य पाहायला जायचे. अनेक राजकीय नेत्यांसोबत खरात याचे घनिष्ठ संबंध आहेत. विशेष म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या अशोक खरात याच्या संस्थेवर सदस्य आहेत.
advertisement

कॅप्टन खरातचा महिलेसोबतचा अत्यंत आक्षेपार्ह Video

एक महिला कॅप्टन खरात याच्याकडे कौटुंबिक समस्या घेऊन येते. त्यावर धार्मिक विधी करण्याचे नाटक करून तो महिलेला आपल्या जवळ ओढून घेत असल्याचे दिसते. एवढ्यावरच न थांबता त्याने काही मिनिटांच्या व्हिडीओत अनेक आक्षेपार्ह कृत्ये केली. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे खरात याच्या दालनाबाहेर अनेक लोक थांबलेले असताना, त्यांची पर्वा न करता तो चाळे करण्यात गुंग होता.
advertisement

महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून धार्मिक विधीचे ढोंग

कॅप्टन खरात याने महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून पूजा करण्याचे नाटक केले. धार्मिक विधीचे ढोंग करीतच त्याने महिलेशी गैरवर्तन केले. संबंधित व्हिडीओ खूपच आक्षेपार्ह असल्याने तो दाखवता येऊ शकत नाही. हा व्हिडीओ २०२४ मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

खरातकडे ५८ व्हिडीओ सापडले

अशोक खरात याच्याकडे अत्यंत आक्षेपार्ह असलेले महिलांचे ५८ व्हिडीओ सापडल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवार रात्री अटकेची कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी जप्त केलेल्या पेनड्राईव्हमधून ५८ व्हिडीओ पोलिसांच्या हाताला लागल्याचे सांगण्यात येते.
advertisement

कोण आहे कॅप्टन अशोक खरात?

कॅप्टन खरात हा सैन्यदलातील निवृत्त अधिकारी आहे
गुरू मुजूमदार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्मॉलॉजीचे शिक्षणही त्याने घेतले आहे
सैन्य दलातील २२ वर्षांच्या सेवा काळात तो तब्बल १५४ देश फिरल्याचे बोलले जाते
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कॅप्टन खरात याची एक आध्यात्मिक संस्था आहे
शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट आहे
advertisement
याच ट्रस्टचा संस्थापक अशोक खरात असून रूपाली चाकणकर सदस्या आहेत
अनेक राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील महत्त्वाचे लोक खरात याच्याकडे भविष्य पाहायला जात असत.
अनेक राजकीय नेत्यांसोबत आणि राजकारणी कुटुंबासोबत खरात याचे घनिष्ठ संबंध आहेत.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्याच्याकडे भविष्य पाहण्यासाठी गेले होते
तेव्हा कॅप्टन खरात महाराष्ट्रात रातोरात लोकप्रिय झाला होता
advertisement
भोंदूगिरीच्या माध्यमातून त्याने अनेक महिलांचा छळ केल्याचा आरोप आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Captain Kharat: कॅ. खरातचं धक्कादायक कांड, महिलेसोबतचा आक्षेपार्ह Video, केबिनबाहेर लोकांच्या रांगा-बाबा चाळ्यात गुंग...!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement