'I LOVE YOU...', तळहातावर मेसेज लिहून 21 वर्षीय तरुणीने संपवलं जीवन, नाशकातील मन हेलावणारी घटना

Last Updated:

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील ध्रुवनगरमध्ये एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे.

Ai Generated Image
Ai Generated Image
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील ध्रुवनगरमध्ये एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे. घरात कुणीनी नसताना तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या तळहातावर आई-वडिलांसाठी खास संदेश लिहिला होता. हा मेसेज वाचून पोलीसही हेलावून गेले. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीक्षा दत्तू त्रिभूवन असं आत्महत्या करणाऱ्या २१ वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. दीक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असं लिहिलं होतं. रविवारी (दि. १८ जानेवारी) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तिने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आलं. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
advertisement

शांत आणि अभ्यासू स्वभाव

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा ही दिव्यांग होती. ती स्वभावाने अत्यंत शांत आणि अभ्यासू होती. तिच्या अशा अचानक जाण्याने त्रिभूवन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

advertisement
या घटनेप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण काय होते? तिच्यावर काही मानसिक दडपण होते का? या दिशेने पोलीस सध्या तपास करत आहेत. अभ्यासू आणि प्रेमळ दीक्षाने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने ध्रुवनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'I LOVE YOU...', तळहातावर मेसेज लिहून 21 वर्षीय तरुणीने संपवलं जीवन, नाशकातील मन हेलावणारी घटना
Next Article
advertisement
Silver Price : तुफान आलंय...चांदीच्या दरात त्सुनामी, प्रति किलोचा दर ऐकालं तर  डोळे पांढरे होतील, एक्सपर्टने दिला इशारा
तुफान आलंय...चांदीच्या दरात त्सुनामी, प्रति किलोचा दर ऐकालं तर डोळे पांढरे होती
  • सराफा बाजारात चांगलीच उलथापालथ सुरू झाली आहे.

  • सोनं-चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दराने रेकोर्डब्रेक दर गाठला अ

  • अवघ्या ३८ दिवसांत चांदीच्या दराने एक लाखाची उसळण घेतली

View All
advertisement