नाशिक सातपूर गोळीबार प्रकरण, आरोपी लोंढेच्या ऑफिसमध्ये भुयारी खोली, पोलिसांनी डोक्याला हात लावला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nashik Police: प्रकाश लोंढे याच्या एका अनधिकृत कार्यालयावर यापूर्वी देखील पोलिसांनी छापा टाकत ते जमीन दोस्त केले होते.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक: नाशिक पोलिसांनी गोळीबार प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे याच्या घर झडतीत पोलिसांना त्याच्या कार्यालयात भुयारी घर सापडून आले आहे. पोलिसांनी भुयारी घराची झाडाझडती घेतली.
सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना अडवून लुटमार केली जाते, कुणाला धमकावले जाते. दुकानदारांकडून हफ्ते मागितले जातात. नकार दिला तर त्यांना मारहाण केली जाते. एकंदरित या परिसरात लोंढे गँगची दहशत मोठी आहे.राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून आम्हाला कुणीच हात लावू शकत नाही, असे लोंढे गँगमधील सदस्य अप्रत्यक्षपणे वागण्यातून सांगत होते. त्याच आरोपींचा माज नाशिक पोलिसांनी मोडला.
advertisement
प्रकाश लोंढे याच्या एका अनधिकृत कार्यालयावर यापूर्वी देखील पोलिसांनी छापा टाकत ते जमीन दोस्त केले होते. तेव्हाही पोलिसांना असेच एक भुयारी घर सापडून आले होते. यानंतर पुन्हा त्याने त्याच परिसरात नव्याने बांधलेल्या संपर्क कार्यालयात सिनेस्टाईल पद्धतीचे भुयार सापडून आल्याने पोलिसांच्याही भुवाया उंचावल्या आहेत.
या भुयार घराचा वापर लोंढे टोळी नेमकी कशासाठी करत होती याचा आता पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक नाना लोंढे, संतोष पवार पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य सूत्रधार असलेला भूषण लोंढे मात्र अद्यापही फरार आहे.
advertisement
सातपूर गोळीबार प्रकरण
सातपूर गोळीबार प्रकरणी आतापर्यंत सात जण पोलिसांच्या ताब्यात, तर भूषण लोंढेसह इतर अद्याप फरार आहेत. प्रकाश लोंढे, दिपक लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे यांच्यावर गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जखमी मेश्राम कुटुंबाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल पाटील, आकाश अडांगळे, दुर्गेश वाघमारे या तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
October 12, 2025 4:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिक सातपूर गोळीबार प्रकरण, आरोपी लोंढेच्या ऑफिसमध्ये भुयारी खोली, पोलिसांनी डोक्याला हात लावला