Nashik: बाप गेल्याचं दु:ख झालं नाही, मुलाचंही टोकाचं पाऊल, ५ दिवस गायब, पोलिसांनी शोधल्यावर...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nashik: नाशिकच्या सिडको परिसरात राहणारा शुभम व्यापारी. १५ दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. हेच दु:ख त्याला सहन न झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले.
नाशिक : वडिलांच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसाने मुलानेही टोकाचे पाऊल उचलले. नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या शुभम व्यापारी असे एकवीस वर्षीय आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी मुलानेही टोकाचं पाऊल उचललं
नाशिकच्या सिडको परिसरात दत्त चौक येथे राहणाऱ्या २१ वर्षे शुभम व्यापारी या युवकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुभम व्यापारी हा १५ जानेवारी रोजी बेपत्ता असल्याची नोंद अंबड पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता सिडकोत एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. त्या मृतदेहाची ओळख पटवली असता तो शुभम व्यापारी असल्याची खात्री पटली आणि त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
बाप गेल्याचं दु:ख झालं नाही
दरम्यान, शुभम व्यापारी याचे वडील पंधरा दिवसांपूर्वी मृत्यूमुखी पडले होते. हेच दुःख सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. या संदर्भात अंबड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 3:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik: बाप गेल्याचं दु:ख झालं नाही, मुलाचंही टोकाचं पाऊल, ५ दिवस गायब, पोलिसांनी शोधल्यावर...









