स्मृतीसोबत लग्न मोडलं, आता पलाश मुच्छल काढणार पिक्चर; हा मराठमोळा अभिनेता लीड रोलमध्ये
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Palash Muchhal new film : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न मोडलं. आता लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल सिनेमा काढण्याच्या तयारीत आहे. त्याच्या सिनेमाचा हिरो हा मराठमोळा हिरो आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पलाश मुच्छलच्या सिनेमाचा हिरो हा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे असणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे. त्यांनी लिहिलंय, "पलाश मुच्छल यांच्या पुढील सिनेमात श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारणार आहे. सिनेमाचा सेट मुंबईमध्ये असेल आणि श्रेयस एका सामान्य माणसाची भूमिका साकारणार आहे."
advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून श्रेयस तळपदे त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने 'गोली मार के ले लो', 'कट्टी बट्टी', 'पुणेरी मिसळ', आणि 'इमर्जन्सी' सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. विनोद आणि नाट्य या दोन्हींवर त्याची मजबूत पकड असल्याने तो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. पलाश मुच्छलसोबतचा हा प्रकल्प त्याला एका नवीन रूपात सादर करेल.
advertisement
पलाश मुच्छलचा हा सिनेमा दैनंदिन जीवन, मानवी नातेसंबंध आणि सामाजिक समस्यांवर आधारित असणार आहे. त्याने 2024 मध्ये 'काम चालू है' 2022 चा 'अर्ध' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्याचा नवीन सिनेमा मुंबईमध्ये घडतो. एका सामान्य माणसाची कथा जी मुंबईच्या रस्त्यांशी, लोकल ट्रेनशी आणि ग्लॅमरशी जोडलेली आहे. सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. सिनेमाचं नाव, कलाकार आणि रिलीज डेट अद्याप सांगण्यात आलेली नाही.










