Nashik News: ब्रह्मगिरी आणि अंजनेरी पर्वतादरम्यानचा प्रवास सुस्साट होणार, ३ तासांचे अंतर ११ मिनिटांत पार!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ब्रह्मगिरी ते अंजनेरी पर्वतावर जाण्याच्या रोपवेचे काही कारणास्तव काम बंद होते. पण आता लवकरच त्या कामाला सुरूवात होणार आहे.
नाशिक: नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ब्रह्मगिरी ते अंजनेरी पर्वतावर जाण्यासाठी रोपवेला अखेर मंजुरी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. पण त्यावेळी अनेक पर्यावरण प्रेमींकडून विरोध दर्शवला जात होता. ब्रह्मगिरी ते अंजनेरी पर्वतावर मोठ्या प्रमाणावर प्राणी पाहायला मिळतात. त्यामुळे प्राणीप्रेमींकडून आणि पर्यावरणप्रेमींकडून या प्रकल्पाला विरोध दर्शवला जात होता. पण आता अखेर मंजुरी मिळाली असून हिरवा कंदील मिळाला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी हा रोपवे सुरू करण्याचा विचार शासनाचा आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून या प्रकल्पाच्या इतरत्र कामाला सुरूवात झाली आहे.
3 तासांचा प्रवास किती वेळात पूर्ण होणार?
त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी ते अंजनेरी पर्वतावर जाण्यासाठी 3936 किमी लांबीच्या रोपवेच्या कामाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. तीन तासांचा प्रवास आता फक्त 11 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. रोपवेने जाण्यासाठी 11 मिनिटांचा वेळ लागणार आहे. रोपवेमुळे ज्येष्ठांपासून लहान मुलांसाठीही पर्वत चढण्याचा प्रश्न कायमचा दूर होणार आहे. सर्वांनाच गोदावरीचे उगमस्थान पाहण्याचे आणि ब्रह्मगिरीचे दर्शन घेणे सोप्पे होणार आहे. प्रत्येकजण आपआपल्या सोयीप्रमाणे ब्रह्मगिरी ते अंजनेरी पर्वतावर जाऊ शकणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये रोपवे चालवली जात आहे, तो गिधाडाचा परिसर आहे. या परिसरामध्ये गिधाडांना सुरक्षित ठेवून आता जिल्हा प्रशासनाकडून ब्रह्मगिरी ते अंजनेरी पर्वतावर रोपवे चालवला जाणार आहे.
advertisement
रोपवेच्या कामाची जबाबदारी 'बर्नार्ड' नावाच्या कंपनीला देण्यात आली आहे. अलीकडेच रोपवेच्या कामाला प्रशासनाकडून मंजूरी मिळाली असून लवकरच रोपवेच्या कामाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, जमीन मालकांना थेट खरेदीसाठी नोटीस बजावण्यात आली असून 15 दिवसांमध्ये काही हरकती असल्यास सादर करण्यासाठी सांगितले आहे. 2027 मध्ये येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी हे काम पूर्ण करण्याचा मानस नजरेसमोर ठेवण्यात आला आहे. एकूण 18 टॉवर्सवरून अंजनेरी ते ब्रह्मगिरीपर्यंत 'रोप- वे' उभारणार असल्याचे बोलले जात आहे. एकूण संपूर्ण प्रकल्पाला 550 कोटींचा खर्च लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण काम होण्यासाठी जेमतेम दोन वर्षांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. अंजनेरी ते ब्रह्मगिरीपर्यंत या रोप- वेची निर्मिती केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाकडून नुकताच जमीन संपादन प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 4:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: ब्रह्मगिरी आणि अंजनेरी पर्वतादरम्यानचा प्रवास सुस्साट होणार, ३ तासांचे अंतर ११ मिनिटांत पार!









