advertisement

Sanju Samson : 'रुलाएगा क्या पगले...', संजूने कॅप्टन सूर्याला केलं गप, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला Video

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या करो या मरो सामन्यात संजू सॅमसनने ऐतिहासिक खेळी करून टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये नेलं. या खेळीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनचं कौतुक केलं.

'रुलाएगा क्या पगले...', संजूने कॅप्टन सूर्याला केलं गप, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला Video
'रुलाएगा क्या पगले...', संजूने कॅप्टन सूर्याला केलं गप, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला Video
कोलकाता : टी-20 वर्ल्ड कपच्या करो या मरो सामन्यात संजू सॅमसनने ऐतिहासिक खेळी करून टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये नेलं. रविवारी इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेटने विजय झाला. संजू सॅमसनने या सामन्यात नाबाद 97 रन केले. या खेळीनंतर संजू सॅमसनचा ड्रेसिंग रूममधला इमोशनल व्हिडिओ समोर आला आहे. ही खेळी संजूसाठी किती महत्त्वाची होती, हे या व्हिडिओमधून दिसत आहे.
बीसीसीआयने सोमवारी टीम इंडियाच्या विजयानंतरचा व्हिडिओ शेअर केला. मॅच संपल्यानंतर संजू सॅमसनने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं आणि टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत सेलिब्रेशन केलं, यानंतर संजू ड्रेसिंग रूममध्ये गेला. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर संजू गुडघ्यांवर बसला आणि हात जोडून प्रार्थना करायला लागला. यानंतर त्याने बॅटचं चुंबन घेतलं.
या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने संजूचं कौतुक केलं. 'मी कायमच म्हणतो चांगल्या लोकांसोबत चांगलं होतं आणि योग्य वेळी होतं. यापेक्षा चांगली वेळ आणि यापेक्षा चांगलं व्यासपीठ कुणासाठीही असू शकत नाही. टीमला जे हवं होतं ते त्याने करून दाखवलं. संजू जेव्हा टीममध्ये आला तेव्हा त्याने ग्रुपला सगळ्यात आधी सांगितलं की असं काहीतरी करूया जे टीमला पाहिजे, ना की तुम्हाला. आयुष्यात आपण खूप काही बघितलं, चढ-उतार. पूर्ण वर्ष काय झालं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, त्याचं स्थान गेलं, आपली आवडती जागा सोडून त्याला दुसरीकडे बॅटिंग करावी लागली आणि मग पुन्हा तो त्याच्या जागेवर परत आला', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
advertisement
'वर्ल्ड कप जिंकणं सोपं नाही, आयसीसी स्पर्धांमध्ये ज्या मॅच खेळल्या जातात, त्या बहादूर लोकांकडून जिंकल्या जातात. संजूची ही खेळी बहादूर होती. चांगल्या सुरूवातीनंतर तो वाहवत जाऊ शकला असता, पण त्याने एक बाजू सांभाळली. तो टीमला पुढे घेऊन गेला. मी त्याच्यासाठी, त्याच्या पत्नीसाठी त्याच्या कुटुंब आणि चाहत्यांसाठी खूश आहे, जे त्याच्यावर प्रेम करतात. आम्ही फक्त एक पाऊल दूर आहोत. विजयाची घोडदौड सुरू राहिल, अशी अपेक्षा आहे. सांगायला बरंच काही आहे, मी खूप आनंदी आहे', असं वक्तव्य सूर्यकुमार यादवने केलं.
advertisement
कर्णधार सूर्यकुमार यादवकडून झालेलं कौतुक ऐकून संजू सॅमसनने माहोल हलका केला. 'रुलाएगा क्या पगले', असं संजू सॅमसन कर्णधार सूर्यकुमार यादवला म्हणाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sanju Samson : 'रुलाएगा क्या पगले...', संजूने कॅप्टन सूर्याला केलं गप, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला Video
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement