advertisement

Trimbakeshwar News: अरे देवा! आधी सुरक्षारक्षकांनी मारलं अन् आता 'त्र्यंबकेश्वर'चे विश्वस्त म्हणाले, भाविकच ड्रग्सच्या आहारी, नेमकं घडलं काय?

Last Updated:

सुरक्षा रक्षकांमध्ये आणि भाविकांमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाविकांकडून सुरक्षा रक्षकावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. आता अखेर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी कारवाई केलेली आहे.

News18
News18
नाशिक: सुरक्षा रक्षकाने त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातील भाविकांना केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ह्या व्हायरल व्हिडिओवर आता मंदिर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. रविवारी 1 मार्च रोजी सुरक्षा रक्षकांमध्ये आणि भाविकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर पुढे मोठ्या वादामध्ये झाले. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाविकांकडून सुरक्षा रक्षकावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. आता अखेर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
नेमकं प्रकरण काय घडलं?
हरियाणामधील एक व्यक्ती त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आला होता. त्याचा काही कारणामुळे सुरक्षा रक्षकासोबत वाद झाला होता. त्यानंतर झालेल्या झटापटीत सुरक्षा रक्षकांनी भाविकाला मारहाण केली. या घटनेनंतर पुन्हा एकदा मंदिरातील सुरक्षा रक्षकांच्या दादागिरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. ज्या भाविकाला मारहाण झाली त्याचा शोध न लागल्यामुळे पोलीस शिपाई अमोल गोविंद बोराडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
गुन्हा दाखल
पोलीस शिपायांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काही सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेश देवरे करत आहे. सुरक्षारक्षक पप्पू आचारी (रा. इंदिरानगर, त्र्यंबकेश्वर), तुकाराम बुरूंगे (रा. त्र्यंबकेश्वर) यांच्यासोबत तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मंदिरातील सुरक्षा व्यवस्था, भाविकांचे हक्क आणि शिस्त यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आता अशातच त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून सर्व आरोपींवर कोणती शिक्षा होते. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
विश्वस्तांचे स्पष्टीकरण
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले यांनी व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण देताना सांगितले की, व्हायरल व्हिडिओतील मारहाण वस्तुस्थितीला धरून नाही. संबंधित भाविक मंदिरात आला होता आणि साधारण तासभर ध्यानसाधनेसाठी बसला होता. गर्दी वाढल्यामुळे दर्शनात अडथळा निर्माण झाल्याने सुरक्षा रक्षकांनी त्याला दक्षिण बाजूच्या दर्शन बारीत बसवले. पण तरीही तो जबरदस्तीने आत शिरला. यानंतर इतर सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखत मंदिराबाहेर काढले. पुढे चौकशीत संबंधित भाविक ड्रग्जच्या आहारी असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा घुले यांनी केला. त्यानंतर त्या भाविकाने माफी मागून तेथून निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Trimbakeshwar News: अरे देवा! आधी सुरक्षारक्षकांनी मारलं अन् आता 'त्र्यंबकेश्वर'चे विश्वस्त म्हणाले, भाविकच ड्रग्सच्या आहारी, नेमकं घडलं काय?
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement