नातवाला वाचवण्यासाठी आजीची बिबट्याशी झुंज,सोयाबीनच्या शेतात थरार; सिन्नरची घटना

Last Updated:

मुलाच्या पाठीला बिबट्याची नखे लागल्यामुळे तो जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

Leopard attack
Leopard attack
नाशिक : नातवाला वाचण्यासाठी आजीनं जीवाच्या आकांताने बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण तर वाचवलेच मात्र त्या बिबट्यालाही पिटाळून लावले. सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथे एका सहा वर्षाच्या नातवावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. मात्र आजीने त्याचाजोरदारपणे प्रतिकार केला अन् नातवाची बिबट्याच्या तावडीतून सुटका करून आजीने त्याचा जीव वाचवल्याची घटना तालुक्यातील खडांगळी येथे रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली आहे,
या घटनेत शिव संपत बोस (6) हा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. लंकाबाई पंढरीनाथ बोस (75) या आजीने सर्वस्व पणाला लावून बिबट्याचा हल्ला परतवून लावल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. खडंगळठी-पंचाळे शिव रस्त्यावर निमगाव-देवपूर शिवारात संपत बोस यांची वस्ती आहे. तेथून काही अंतरावर त्यांचा एक भाऊ वास्तव्यास आहे. या भावाकडे शिव खेळण्यासाठी गेला होता.
advertisement

बिबट्याचा प्रतिकार करत तावडीतून केली मुलाची सुटका 

सकाळी 11.30 च्या सुमारास आजी लंकाबाई त्याला परत घेऊन येत होत्या. त्यावेळी सोयाबीनच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर झडप घातली. यावेळी आजीने प्रसंगावधान राखून सर्व शक्तिनिशी बिबट्याचा प्रतिकार करत तावडीतून मुलाची सुटका केली. सुटका केल्यानंतर आजीने आरडा ओरडा करताच मदतीसाठी धावा केला, स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर बिबट्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सोयाबीनच्या शेतात धूम ठोकली. मुलाच्या पाठीला बिबट्याची नखे लागल्यामुळे तो जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. हिंसक बिबट्याला कडवी झुंज देऊन परतवून लावले आहे. नातवाला वाचविण्यासाठी आजीने बिबट्याशी झुंज दिल्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे .
advertisement

बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला आहे. तिथून दीड किलोमीटर असलेल्या अंतरावर असलेल्या धनगरवाडी शिवारातही बिबट्याला पकडण्यासाठी दुसरा पिंजरा लावण्यात आला आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने ठोस कृती कार्यक्रम राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, संतप्त गावकऱ्यांनी तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग आता यावर काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नातवाला वाचवण्यासाठी आजीची बिबट्याशी झुंज,सोयाबीनच्या शेतात थरार; सिन्नरची घटना
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement