Lok Sabha Election : महायुतीत जागावाटपाचा तिढा कसा सुटणार? भुजबळांच्या वक्तव्याने वादाच्या ठिणगीची शक्यता

Last Updated:

भाजपकडून सर्वाधिक जागांची मागणी आणि मित्र पक्षांना कमी जागा मिळत असल्याने काही ठिकाणी नाराजीचा सूरही दिसून येत आहे.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
लक्ष्मण घाटोळ, नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीत जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू आहेत. दरम्यान, यात भाजपकडून सर्वाधिक जागांची मागणी आणि मित्र पक्षांना कमी जागा मिळत असल्याने काही ठिकाणी नाराजीचा सूरही दिसून येत आहे. आता जागावाटपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी नकार दिला आहे आणि जागेबाबत काही ठरलं नाहीय. त्याबाबत मीडियावर चर्चा नको असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. भुजबळ पुढे म्हणाले की, त्यांचे आमदार मोदी लाटेवर आलेत  आणि आमचे त्यांच्या विरोधात निवडून आले आहेत. जो निवडून येईल त्याबाबत ते विचार करतील. दिंडोरीच्या जागेबाबात चर्चा केली. 6 पैकी 4 आमदार आहे. पूर्वी आमचे लोक निवडूनसुद्धा आले आहेत. शिंदेच्या शिवसेने इतक्याच जागा आम्हाला मिळाव्या या मतावर भुजबळ ठाम आहेत.
advertisement
महसूल विभागाच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. नाशिकच्या जागेवर दावा आहे पण पक्ष ठरवेल कोण लढवेल.आम्ही किती कामे केले आहेत ही जागा सुटली पाहिजे आणि नंतर उमेदवार ठरेल असंही भुजबळ यांनी म्हटलं. रामदास कदम यांनी भाजपबाबत केलेल्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले की, तशी शार्प प्रतिक्रिया मी देणार नाही. सध्या तरी त्यावर बोलणार नाही.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अरुणाचल प्रदेशमधील त्यांच्या नेत्यांची भेट घेतली. यावरून सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटात एकमेकांवर टीका सुरू आहे. छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, तिथले 8 आमदार आमच्यासोबत आहे. लोकसभेसोबत विधानसभा आहे त्यामुळे त्यांनी भेट घेतली. आम्ही तयारी करणार आहे. शरद पवार यांनी दोन गट झाले नव्हते तेव्हा त्यांनी तिथल्या सरकारला पाठिंबा दिला आहे. तेव्हा ते आले होते, त्यांनीही स्वागत केले होते. कोण काय बोलले असेल मला माहिती नाही
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Lok Sabha Election : महायुतीत जागावाटपाचा तिढा कसा सुटणार? भुजबळांच्या वक्तव्याने वादाच्या ठिणगीची शक्यता
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement