Kumar Vishwas : 'इथे 'ठाकरेंचा' राज चालतो'; नाशिकमधील कार्यक्रमावरुन मनसेचा हिंदी भाषिकांना इशारा

Last Updated:

Kumar Vishwas : नाशिकमध्ये कवी कालिदास सभागृहामध्ये गुरुवारी कवी कुमार विश्वास यांच्या एका कार्यक्रमामध्ये ही घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे.

इथे 'ठाकरेंचा' राज चालतो
इथे 'ठाकरेंचा' राज चालतो
नाशिक, 15 सप्टेंबर (लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी) : कवी कुमार विश्वास यांच्या नाशिकमधील एका कवी संमेलनाच्या कार्यक्रमात काल (14 सप्टेंबर) मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला. हा कार्यक्रम फक्त हिंदी भाषिकांसाठीच असल्याचं उत्तरही देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे त्या कवी कालिदास नाट्यगृहाबाहेर या कार्यक्रमाच्या स्वागताचे भाजप आमदार सीमा हिरे आणि नगरसेवकाचे होर्डिंग दिसत आहे. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी एक्स (ट्विटर) माध्यमातून इशारा दिला आहे.
न्युज 18 लोकमतच्या बातमीची मनसेकडून दखल
नाशिकमध्ये मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्याने झालेल्या वादावर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. न्युज 18 लोकमतने दाखवलेली बातमी ट्विट करत शालिनी ठाकरे यांनी हिंदी भाषिकांना गंभीर इशारा दिला आहे. "नाशकात मराठी माणसाला कार्यक्रमात प्रवेश नाही? एवढा माज? कुमार विश्वासला जर हिंदी भाषिकांसाठी कार्यक्रम करायचे असतील तर दिल्लीत करावे. महाराष्ट्रात ही नाटके खपवून घेतली जाणार नाहीत. इथे 'ठाकरेंचा' राज चालतो.", असा इशारा शालिनी ठाकरेंनी हिंदी भाषिकांना दिला आहे. कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या काव्य संमेलनाला मराठी भाषिकांना काल नाकारला प्रवेश होता. हिंदी प्रसारण सभेच्या वतीने नाशिकच्या कालिदास कला मंदिरात कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्यानंतर सर्वात अगोदर न्यूज 18 लोकमतनेच बातमी दाखवली होती.
advertisement
जाहिरात केली पण पास कुठे मिळतात हे सांगितलं नाही
कुमार विश्वास यांच्या कार्यक्रम नाशिकमध्ये ) असल्याचं नाशिकच्या चौकाचौकात लावण्यात आले आहेत. हिंदी दिनानिमित्त हिंदी प्रसारिणी सभा नाशिकद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे पास कुठे उपलब्ध होतील याची माहिती मात्र कुठेही देण्यात आली नाही. या कार्यक्रमाची जाहिरात ही मराठी वृत्तपत्रातही देण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणीही याच्या पास वा तिकीटाची माहिती दिलेली नाही.
advertisement
पास मिळाला नसल्याने आरोप
कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमाचा पास मिळाला नसल्याने काहींनी चुकीचे आरोप केले असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. जागा कमी आणि लोक जास्त झाल्याने, योग्य नियोजन न झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Kumar Vishwas : 'इथे 'ठाकरेंचा' राज चालतो'; नाशिकमधील कार्यक्रमावरुन मनसेचा हिंदी भाषिकांना इशारा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement