Nashik Accident : एसटीची भीषण धडक, रस्त्यावर रक्तामांसाचा चिखल...5 ठार; कसा झाला अपघात?

Last Updated:

एसटी बस जळगावकडून नाशिकला जात होती. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला अशी माहिती समोर येतेय.

News18
News18
बब्बु शेख, प्रतिनिधी
चांदवड : मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 प्रवासी जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बसची एक बाजू पूर्ण कापली गेली. यामुळे त्या बाजूला बसलेले प्रवासी रस्त्यावर पडले. यात काहींचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकला धडकल्यानंतर भीषण अपघात झाला.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एसटी बस जळगावकडून नाशिकला जात होती. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला अशी माहिती समोर येतेय. अपघातात एसटीची एक बाजू कापली गेलीय. घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल पडला होता. अनेक प्रवासी रस्त्यावर पडले. घटनास्थळावरील दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी होते. रस्त्यावर मृतदेह पडले होते. ज्या बाजूला धडक बसली त्या बाजूचे प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमी प्रवाशांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
advertisement
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड जवळ एसटी आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तर मृतदेहांची ओळख पटवण्यात येत आहे.
मयतांच्या नातेवाईकांना 10 लाख तर गंभीर जखमींना 5 लाख रुपयांची मदत
दरम्यान, चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गांवर मंगळवारी सकाळी एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णलायला भेट देऊन जखमीची विचारपूस करत त्यांना धीर दिला या अपघातात मयत झालेल्या प्रवाशांच्या वारसाना 10 लाख रुपयांची तर गंभीर जखमीना 5 लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात येईल असे मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलअपघाताची चौकशीचे त्यांनी आदेश दिले आहे.
advertisement
जळगाव येथून नाशिककडे जाणाऱ्या एसटी बसचा चांदवड जवळ भीषण अपघात होऊन त्यात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 28 प्रवासी जखमी झाले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. पुढे चालणारा ट्रक थांबल्यामुळे अपघात झाल्याची माहिती एसटी चालक आणि जखमी महिला प्रवाशाने दिली.
मृतांची नावे 
1) साई संजय देवरे ( वय - 14) रा. उमराने ता.देवळा जि.नाशिक
advertisement
2) बळीराम सोनू आहिरे ( वय - 64) रा.प्लॉट नंबर ७ शांतीवन,कॉलेज रोड नाशिक
3) सुरेखा सीताराम साळुंखे ( वय - 58)
4) सुरेश तुकाराम सावंत ( वय - 28) रा.मेशी डोंगरगाव ता.देवळा
एका मयताचे नाव नाही कळले
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Accident : एसटीची भीषण धडक, रस्त्यावर रक्तामांसाचा चिखल...5 ठार; कसा झाला अपघात?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement