17 व्या वर्षी पहिला कांड, नात्यातील तरुणीला बनवलं शिकार, शाळेत कोंबडी चोर नावाने फेमस, अशोक खरातची सगळी कुंडली
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवीन कांड समोर येत आहेत. त्याच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आणि आर्थिक फसवणूक केल्याचे एकूण दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवीन कांड समोर येत आहेत. त्याच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आणि आर्थिक फसवणूक केल्याचे एकूण दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसआयटीकडून या सर्व गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. हा तपास सुरू असताना अशोक खरातचे अनेक कांड उघडकीस येत आहेत. पोलिसांनी त्याची सगळी कुंडलीच बाहेर काढली आहे. त्याने वयाच्या १७ व्या वर्षीच पहिला कांड केल्याचं तपासातून समोर आलं आहे.
१९६५ साली सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी इथं जन्म झालेल्या अशोक खरातने वयाच्या १७ व्या वर्षी पहिला कांड केला होता. त्याने आपल्याच नात्यातील एका तरुणीचं लैंगिक शोषण केलं होतं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तो गावातून पळून गेला होता. मर्चंट नेव्हीत नोकरी मिळाल्याचं कारण सांगून त्यानं गावातून काढता पाय घेतला होता. यानंतर त्याने जवळपास सहा ते सात वर्षे मर्चंट नेव्हीत हमाल म्हणून काम केलं. पण तो जेव्हा गावात परतला तेव्हा त्याने आपण मर्चंट नेव्हीत कॅप्टन असल्याची थाप मारली.
advertisement
याच्या या खोटेपणाला अनेकजण बळी पडले. मर्चंट नेव्हीमध्ये काम करताना तो काही काळ पश्चिम बंगालमध्ये देखील वास्तव्यास होता. याच ठिकाणी त्याने भोंदूगिरीचे धडे गिरवल्याचं सांगण्यात येतं. हाचचलाखी शिकाल्यानंतर त्याने नाशिकमध्ये येऊन १९९७-९८ साली ऑफिस थाटलं आणि भोंदूगिरीचा बिझनेस सुरू केला.
शाळेत कोंबडीचोर म्हणून प्रसिद्ध
अशोक खरातने भोंदूबाबा बनून अनेकांना खोटे गंडे, दोरे आणि खडे देऊन चुना लावला आहे. पण अशोक खरात शालेय वयापासून यात पटाईत असल्याची माहिती आहे. तो आपल्या स्वत:च्या घरातून कोंबड्यांची अंडी चोरायचा आणि शाळेत विकायचा अशी माहिती आता समोर आली आहे. यामुळे शाळेत त्याला कोंबडी चोर आणि मोटर चोर नावाने चिडवायचे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 2:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
17 व्या वर्षी पहिला कांड, नात्यातील तरुणीला बनवलं शिकार, शाळेत कोंबडी चोर नावाने फेमस, अशोक खरातची सगळी कुंडली









