Nashik News: चिंता नको! आता नाशिकरांना ३ दिवसांत मिळणार गॅस सिलेंडर, फक्त हे काम करावं लागणार
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
गॅस सिलिंडर बुकिंगसाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाची स्थापना करत सोप्प्या पद्धतीने गॅस बुकिंगची प्रक्रिया दिली आहे. यामुळे नागरिकांना 2 ते 3 दिवसांत सिलिंडर घरपोच मिळणार आहे, नेमकी काय आहे ती प्रक्रिया जाणून घेऊया...
नाशिक: आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. अनेक प्रमुख शहरांमध्ये नागरिकांना सिलिंडरसाठी मोठ्या प्रमाणावर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी नागरिकांना सिलिंडर बुक करताना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नाशिकमध्ये गॅस सिलिंडर पुरवठ्यावर काही परिणाम होऊ नये, यासाठी गॅस कंपन्यांचे सिलिंडर बुक झाल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये मिळणार असल्याची माहिती गॅस एजन्सीने दिली आहे. त्यासाठी गॅस एजन्सीने काही विशेष नंबर दिले आहेत. सोबतच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर वेळेवर गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्यामुळे लांबच लांब रांगा लावल्या जात आहेत. अनेक नागरिक रिकामे सिलिंडर घेऊनच थेट कार्यालयाच्या बाहेर येत नंबर लावण्यासाठी येत होते. गॅस तुटवड्याबद्दल नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियंत्रण कक्षाची स्थापना केली गेली आहे. HPCL, IOC आणि BPCL या तीन कंपन्यांचे गॅस सिलिंडर बुक झाल्यानंतर साधारणत: 2 ते 3 दिवसांमध्ये घरपोच मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहनही केले आहे. नागरिकांनी गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नका आणि सोशल मीडियावर पसरवणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाईगडबडीत अतिरिक्त सिलिंडर घेण्याची गरज नाही, पुरवठा सुरळीत सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, सिलिंडरची टंचाई होईल यासाठी आधीच घाई- गडबड करू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांनी नागरिकांना केले आहे. जर, नागरिकांना गॅस संबंधित कोणतीही अडचण असेल तर, सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत (०२५३) २३१७१५१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.
advertisement
एचपीसीएल- HPCL
- व्हॉट्स ॲप बुकिंग- 22222 01122
- मिस्ड कॉल बुकिंग- 24936 02222
- एचपीसीएल ॲपच्या माध्यमातून बुकिंग- एचपी पे ॲप
- ऑनलाइन बुकिंग कॉलिंग - 88888 23456
- ऑनलाइन बुकिंग - https://www.hindustanpetroleum.com myhpgas.in
बीपीसीएल- BPCL
- व्हॉट्स ॲप बुकिंग- 1800 224 344
- मिस्डकॉल बुकिंग- 77109 55555
- IVRS Booking- 77150 12345/ 77180 12345
- बीपीसीएल ॲपच्या माध्यमातून बुकिंग- Hello BPCL App
- ऑनलाइन बुकिंग- https://www.bharatgas.com/bharatpetroleum.in
- सिलिंडर बुकिंगसाठी इतर माध्यम G-pay, Phone pe, Amazon pay यांचाही उपयोग करता येणार आहे.
advertisement
आयोसीएल- IOCL
- व्हॉट्स ॲप बुकिंग- 75888 88824
- मिस्ड्कॉल बुकिंग - 84549 55555
- SMS/IVR बुकिंग- 77108 95555
- ऑनलाइन बुकिंग - https:/cx.indianoil.in
या प्रमाणे गॅस सिलिंडर बुक केल्यास नाशिककरांनो तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये घरपोच गॅस मिळून जाणार आहे.
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 6:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: चिंता नको! आता नाशिकरांना ३ दिवसांत मिळणार गॅस सिलेंडर, फक्त हे काम करावं लागणार









