Nashik News: नाशिककरांवर ‘कोल्ड वेव्ह’चं संकट, धोका वाढला, शाळांबाबत मोठा निर्णय
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Nashik News: उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ‘कोल्ड वेव्ह’चा धोका वाढला आहे. नाशिकमधील शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक : उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली आहे. नाशिक शहरात देखील हाडे गोठवणारी थंडी असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिका शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिकेच्या आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या सकाळच्या सत्रातील वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा आता नव्या वेळापत्रकानुसार भरतील.
बदललेल्या वेळा खालीलप्रमाणे:
सकाळ सत्र: शहरातील सर्व महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक तसेच खासगी प्राथमिक शाळा आता सकाळी 7:30 ऐवजी 8:00 वाजता सुरू होतील आणि दुपारी 12:30 वाजेपर्यंत चालतील.
दोन सत्रांत भरणाऱ्या शाळा: ज्या शाळा दोन सत्रांत भरतात, त्यांच्या सकाळच्या सत्राची वेळ आता सकाळी 8:00 ते दुपारी 12:00 अशी असेल.
दुपारचे सत्र : दुपारच्या सत्राच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे सत्र पूर्वीप्रमाणेच 12:20 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत सुरू राहील.
advertisement
या बदललेल्या वेळेनुसार, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा सुरू होण्याच्या किमान अर्धा तास पूर्वी शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर खासगी प्राथमिक शाळांना त्यांच्या स्तरावर, विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन, शाळेच्या वेळेबाबत निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी ही माहिती दिली असून, पालकांनी व शाळा प्रशासनाने याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
December 12, 2025 8:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: नाशिककरांवर ‘कोल्ड वेव्ह’चं संकट, धोका वाढला, शाळांबाबत मोठा निर्णय









