Malegaon News: आधी टिपू सुलतानचा वाद, आता मालेगावात शिवरायांचा पुतळा; पहिलाच ठराव मंजूर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगावामध्ये टिपू सुलतानचा वाद चांगलाच चर्चेत आला होता. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे. महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
मालेगाव: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. शिव जयंतीच्या पुर्व संध्येला मालेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मंजूरी देण्यात आली आहे. सर्वानुमते या स्मारकाला काल मंजुरी देण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाने देखील स्मारकाच्या ठरावाला मंजुरी दिली आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या पहिल्याच महा सभेमध्ये हा महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. महासभेमध्ये हा ठराव मंजूर केल्यानंतर घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
मालेगाव महानगरपालिकेमध्ये, इस्लाम, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीचे महापौर आहेत. महापौर नसरिन बानो खालिद शेख यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या महासभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या महासभेतच हा ठराव मंजूर करण्यात आला असून कोणत्या ठिकाणी स्मारक उभारले जाणार आहे, याबद्दलही माहिती देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सायने येथे उभारले जाणार आहे. इस्लाम पक्षाचे नगरसेवक उद्धव दरेकर यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. सभागृहातल्या सर्वच सदस्यांनी या ठरावाला मंजूरी दिली.
advertisement
इस्लाम, काँग्रेस आणि समाजवादी या सत्ताधारी पक्षांनी आणि भाजपा, शिंदे गट आणि एमआयएम या विरोधी बाकावरील पक्षांनी या ठरावाला मंजूरी दिली. शिवरायांच्या स्मारकाला सर्वानुमते मंजूरी मिळाल्यानंतर शिंदे गटाच्या आणि भाजपाच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरामध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरून चांगलाच वादंग निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर महापौरांना शिंदे गटातल्या नगरसेवकांनी सर्व महापुरूषांची असलेली फ्रेम भेट दिली. तर, भाजपाच्या नगरसेवकांनी संविधानाची प्रत असलेली फ्रेम भेट दिली. त्यामुळे काही वेळेसाठी सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला.
Location :
Malegaon,Nashik,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 2:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Malegaon News: आधी टिपू सुलतानचा वाद, आता मालेगावात शिवरायांचा पुतळा; पहिलाच ठराव मंजूर










