Sinhastha Kumbhamela: कुंभमेळ्यावरून साधू-महंत आक्रमक, आखाडे आक्रमक भूमिकेत; 25 हजार कोटी गेले कुठे?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
सिंहस्थ कुंभमेळ्याची सध्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तयारी सुरू आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आखाड्यांच्या विकासकामांवरून साधू आणि महंत आक्रमक झाले आहेत.
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ केला जात आहे. या विकासकामांतून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा थेट चेहरा मोहराच बदलणार आहे. कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीमुळे साधू आणि महंत नाराज झाले आहेत. कुंभमेळ्यासाठी विकासकामे करत असताना शासनाकडून निधीची कपात केली जात असल्याचा आरोपच साधू आणि महंतांनी केलेला आहे.
25 हजार कोटींची विकासकामे सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केले जात आहे. दोन टप्प्यांमध्ये एकूण दहा आखाड्यांसाठी विकासकामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वी दहा आखाड्यांना दहा कोटी आणि आता पुन्हा दहा कोटी असे एकूण 20 कोटी रूपये निधी म्हणून देण्यात आले आहे. प्रत्येकी आखाड्याला 2 कोटी रूपये निधी मिळालेला आहे. 25 हजार कोटींमधून आखाड्यांच्या विकासकामांसाठी फक्त 20 कोटी रूपयेच निधी मंजूर करण्यात आला आहे. इतक्या कमी प्रमाणात निधी मंजूर करण्यात आल्यामुळे साधू आणि महंतांकडून नाराजी व्यक्त केलेली जातेय.
advertisement
प्रत्येकी आखाड्यासाठी जरीही 2 कोटी रूपये इतका निधी मंजूर केला गेला असला तरीही यातून जीएसटीची सुद्धा कपात केली गेली आहे. त्यामुळे जीएसटीकापून प्रत्येक आखाड्याला सरकारकडून दीड कोटी रूपयेच मिळाले आहेत. दहा आखाड्यांना मिळून 15 कोटी रूपयांची विकासकामे केली जाणार आहेत. भव्य दिव्य स्वरूपात जरीही हा कुंभमेळा होत असला तरीही सरकारने आखाड्यांच्या सुविधांबद्दल सरकारने हात आखडता घेतला आहे. या आखाड्यांतील असे अनेक कामे आहेत, ज्यांच्या अजूनही कामाला सुरूवात झालेली नाही.
advertisement
एकाच कंत्राटदाराच्या हाती अनेक कामं सोपवल्यामुळे कामाला गतीच मिळत नाहीये. त्यामुळे सध्या अनेक कामांना कासवगती मिळालेली आहे. कामाच्या गतीवरून साधू आणि महंतांनी सरकारवर टीका केलेली आहे. कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो भाविक आणि साधू- महंत येत असतात. त्यांच्या सेवा आणि सुविधांमध्ये कोणतीही कमी भासायला नको, त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, या नियोजनाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 6:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Sinhastha Kumbhamela: कुंभमेळ्यावरून साधू-महंत आक्रमक, आखाडे आक्रमक भूमिकेत; 25 हजार कोटी गेले कुठे?








