Crime News : 4 सप्टेंबरला बेपत्ता, 23 दिवसांनी मृतदेह सापडला,पोलीस शिपायाच्या मृत्यूचं गुढ कायम
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गेल्या 4 सप्टेंबरला बेपत्ता झालेल्या पोलीस शिपाई सोमनाथ फापाळे यांचा मृतदेह सापडला आहे.
Navi Mumbai Crime News : विश्वनाथ सावंत, नवी मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गेल्या 4 सप्टेंबरला बेपत्ता झालेल्या पोलीस शिपाई सोमनाथ फापाळे यांचा मृतदेह सापडला आहे. बेपत्ता झाल्याच्या तब्बल 23 दिवसांनी कळंबोली खाडी तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पण त्यांनी आत्महत्या केली आहे की त्यांची हत्या करण्यात आली आहे? याचा तपास अद्याप लागू शकला नाही आहे.त्यामुळे पोलीस शिपाई सोमनाथ फापाळे यांच्या मृत्यूचे गुढ कायम आहे.
advertisement
पोलीस शिपाई सोमनाथ काशीनाथ फापाळे हे रबाळे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. फापाळे हे 4 सप्टेंबर रोजी रात्रपाळी करून घरी जात असल्याचे सांगून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते परतलेच नाहीत. बराच काळ शोधाशोध करूनही त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने फापाळे कुटुंबियांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी थेट पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढत न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती.
advertisement
या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शोधमोहिम सुरू होती. पण त्यांचा काहीएक थांगपत्ता लागत नव्हता. आज अखेर पोलिसांना त्यांचा शोध लागला आहे. तळोजा येथील खाडीत त्यांचा मृतदेह आढळून आला. तब्बल 23 दिवसांनी हा मृतदेह सापडला आहे. यानंतर डीएनए चाचणी करण्यात आल्या आल्यानंतर पोलिसांनी माहिती दिली. सोमनाथ यांचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
advertisement
दरम्यान सोमनाथ फापाळे हे नाईट ड्यूटीवर असताना त्यांच्या बायको त्यांची सतत फोनवर बोलत होती.त्यांच्यात शेवटचा फोन कॉल हा पावणे आठ वाजता झावा. त्यावेळी त्यांचा आवाज वेगळा वाटल्याने पत्नीचे विचारणा केली असता मी टेन्शन मध्ये आहे फोन चार्जिंगला लावतो नंतर करतो म्हणून त्यांनी फोन ठेवला. त्या नंतर मात्र सोमनाथ यांच्याशी संपर्क झालाच नव्हता. त्यामुळे जर आत्महत्याच करायची असती तर त्यांनी त्यांच्या बायकोला तरी कल्पना दिली असती. त्यामुळे या घटनेच गूढ अजून उकललं नाही आहे.
advertisement
या घटनेने संपूर्ण नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. तसेच या दुर्दैवी घटनेमुळे फापाळे यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, नवी मुंबई पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
September 27, 2025 7:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Crime News : 4 सप्टेंबरला बेपत्ता, 23 दिवसांनी मृतदेह सापडला,पोलीस शिपायाच्या मृत्यूचं गुढ कायम