नवाब मलिक यांच्या जावयाचा मृत्यू, नियंत्रण सुटलेल्या SUV ने दिली धडक
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा मृत्यू झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी समीर खान यांचा अपघात झाला होता, यानंतर ते बरेच दिवस आयसीयूमध्ये होते.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा मृत्यू झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी समीर खान यांचा अपघात झाला होता, यानंतर ते बरेच दिवस आयसीयूमध्ये होते. जावयाच्या मृत्यूनंतर नवाब मलिक यांनी त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या ड्रायव्हरला एसयूव्ही कंट्रोल झाली नव्हती, यानंतर गाडीने समीर यांना टक्कर दिली.
एसयूव्हीच्या या अपघातामध्ये समीर खान यांच्यासह नवाब मलिक यांची मुलगी निलोफरही जखमी झाली होती. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता.
कसा झाला अपघात?
समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिचा पती. निलोफर आणि समीर खान हे नियमित टेस्टसाठी क्रिटी केअर रुग्णालयात गेले होते. टेस्ट झाल्यानंतर दोघे घरी परतण्यासाठी निघाले. हॉस्पिटलच्या बाहेर ते कारची वाट पाहत उभे होते. दरम्यान त्यांचा कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी कार घेऊन आले. अचानक त्यांचा पाय एक्सलेटरवर गेल्याने कार समीर खान यांच्या अंगावर गेली. त्यांच्या मेंदूला मार लागला. त्यांना तात्काळ क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
advertisement
समीर खान यांच्यावर गाडी चालवणारा चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2024 6:18 PM IST


