1 कोटीचं बक्षीस, 170 गुन्हे, 38 वर्षाची दहशत; जहाल माओवादी तारक्काचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण
- Published by:Prachi Amale
Last Updated:
माओवाद्याची भरती बंद असून मोठ्या प्रमाणात शरणागती पत्करत आहेत, त्यामुळे ती संपुष्टात येत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महेश तिवारी, प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोलीमध्ये पोलिस अतिशय चांगले काम करत आहेत, या भागातला माओवाद्यांचा प्रभाव आपण संपवला आहे. आत्मसमर्पणामुळे माओवाद्यांच कंबरडे तोडण्याचे काम झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज ते गडचिरोली दौऱ्यावर होते. देवेंद्र फडणवीसांसमोर आठ पुरूष आणि तीन महिलाांनी आत्मसमर्पण केले. जहाल नक्षलवादी तारक्कांनी देखील त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.
जहाल महिला माओवादी नेता तारक्काने आज गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. तारक्का ही माओवाद्याच्या संघटनेचं देशभरातलं दुसऱ्या क्रमांकाचं नेतृत्व असलेल्या केंद्रीय समिती सदस्य भूपतीची पत्नी आहे. पश्चिम बंगालमध्ये चकमकीत ठार झालेला जहाल माओवादी नेता किशनजीची वहिनी आहे. तारक्का 1983 मध्ये माओवाद्यांच्या संघटनेत दाखल होणारी गडचिरोलीतली पहिली महिला माओवादी आहे.
advertisement
कोण आहे तारक्का?
तारक्का सध्या माओवाद्याच्या दडकरण्या झोनल समितीची सदस्य आहे. तारक्काचे मूळ नाव विमला सीडाम आहे. तिच्यावर 170 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार राज्यात मिळून एक कोटी पेक्षा जास्तीच बक्षीस आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी चळवळीत दाखल करण्यात तारक्काने सगळ्यात मोठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
माओवाद्याची भरती बंद : देवेंद्र फडणवीस
advertisement
देवेंद्र फडणवीस म्हणाले. माओवाद्यांचा प्रभाव संपवून आम्ही गडचिरोली हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा बनविण्यास सुरुवात केली आहे. गडचिरोलीमध्ये एकेकाळी माओवाद्यांचे पूर्ण वर्चस्व होते. आज ते वर्चस्व आम्ही संपवत आहोत. येथे दोन मोठ्या चौक्या बांधल्या आहेत. आता इथे माओवाद्यांना नवीन लोक भेटत नाहीत. माओवाद्याची भरती बंद असून मोठ्या प्रमाणात शरणागती पत्करत आहेत, त्यामुळे ती संपुष्टात येत आहे.
advertisement
उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त : मुख्यमंत्री
आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यात माओवाद हा संपुष्टात आणण्याचे काम केलं आहे. उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली असून दक्षिण देखील लवकरच मुक्त होईल. गेल्या 4 -5 वर्षात एकही जण माओवादामध्ये सहभागी झाले नाही. अनेक जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. अटक करण्यात आली . माओवाद चे कंबरडे मोडण्याचे काम झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.
advertisement
गडचिरोलीच्या पोलीस दलाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली : फडणवीस
फडणवीस, गडचिरोलीच्या पोलीस दलाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. हे सगळ्या पोलीस दलाचे यश आहे.जी काही मदत राज्य सरकार करत राहील,राज्याचा गृह विभाग उभा राहील. 2025 चा हा सूर्य उगवला आहे तो असाच राहिला पाहिजे. ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांचे योग्य काळजी घेतली जाईल
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
Jan 01, 2025 5:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
1 कोटीचं बक्षीस, 170 गुन्हे, 38 वर्षाची दहशत; जहाल माओवादी तारक्काचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण








