जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर होताच शरद पवारांना कोकणात मोठा धक्का
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
महापालिका निवडणुकीचे मतदान ४८ तासांवर असताना निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केली.
राजेश जाधव, प्रतिनिधी, रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडली आहे. कदम यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला.
अडचणीच्या काळात पक्षाला एकाकी मदत करून कोकणामध्ये काम केले होते मात्र आता पक्षानेच मला एकाकी पाडले. मी जेव्हा नगराध्यक्ष पदासाठी उभा होतो तेव्हा पक्षाने मला मदत केली नाही, असा आरोप रमेश कदम यांनी केला.
रमेश कदम यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला
बदललेल्या राजकारणाच्या परिस्थितीत प्रामाणिकपणाला किंमत राहिली नाही. जिथे आपली गरज नाही, तिकडे फार काळ राहण्यात अर्थ नसतो, असे सांगून रमेश कदम यांनी त्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे.
advertisement
पक्षाने मला साथ दिली नाही, रमेश कदम यांची खंत
मी १९८४ सालापासून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या एकनिष्ठ कार्यकर्ता राहिलो आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. ज्यावेळी पक्षाला गरज आहे, त्यावेळी आम्ही कंबर कसून काम करतो. मात्र ज्यावेळी आम्हाला साथ द्यायची वेळ येते, त्यावेळी पक्ष आमच्यामागे उभा राहत नाही. आता प्रामाणिकपणाला फार किंमत राहिली नाही, अशी खंत रमेश कदम यांनी राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे.
advertisement
कोण आहेत रमेश कदम?
रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणातील महत्त्वाचे नेते होते
चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही त्यांनी केले
तसेच चिपळूणचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवले
भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्यातील वैर कोकणात सर्वश्रूत
परंतु यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत भास्करशेठ जाधव आणि रमेश कदम यांनी जुळवून घेतले होते
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 3:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर होताच शरद पवारांना कोकणात मोठा धक्का








