What is PADU: राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर

Last Updated:

What Is PADU : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर?
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर?
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विश्वासात न घेता, कोणतीही कल्पना न देता वेगळं यंत्र वापरण्यात येणार असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.
advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्येच या मशीनचा वापर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. PADU मशीनचा वापर सरसकट कुठेही होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारत इलेक्ट्रिक लिमिटेड (BEL) या कंपनीने विकसित केलेली M3A प्रकारची मतदान यंत्रणा वापरण्यात येणार असून, मतमोजणीदरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य तांत्रिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी PADU मशीनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
advertisement

निवडणुकीच्या धामधुमीत चर्चेत आलेले PADU आहे काय?

PADU म्हणजेच Printing Auxiliary Display Unit. M3A मतदान संयंत्राद्वारे नोंदविण्यात आलेल्या मतांची मतमोजणी करताना सामान्यतः कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडणे आवश्यक असते. मात्र, काही वेळा मतमोजणीदरम्यान कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट जोडताना तांत्रिक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.
अशा परिस्थितीत मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी भारत इलेक्ट्रिक लिमिटेडने विकसित केलेल्या PADU युनिटचा वापर करण्यात येणार आहे. PADU मशीनच्या सहाय्याने कंट्रोल युनिटमधील नोंदवलेली मते स्वतंत्रपणे वाचता येतात आणि त्यामुळे मतमोजणी थांबवावी लागत नाही.
advertisement
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेला एकूण १४० PADU मशीन प्राप्त झाल्या आहेत. या मशीनचा वापर आपत्कालीन किंवा तांत्रिक अडचणींच्या वेळी करण्यात येणार असून, त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि वेग राखला जाणार आहे.
महापालिका निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये आणि तांत्रिक कारणांमुळे निकाल जाहीर होण्यास अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
What is PADU: राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement