साताऱ्याच्या नीलम शिंदेंचा अमेरिकेत हिट-अँड-रन अपघात; केंद्राच्या हस्तक्षेपानंतर कुटुंबाला दूतावासाकडून फोन
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Neelam Shinde Hit And Run Case: अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणाऱ्या साताऱ्याच्या नीलम शिंदे यांच्या कुटुंबीयांना लवकर व्हिसा मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर अमेरिकन दूतावासाने उद्या मुलाखतीसाठी बोलवले आहे.
सातारा/मुंबई: सातारा येथील रहिवासी असलेल्या नीलम शिंदे यांना १० दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये एका चारचाकी वाहनाने धडक दिली होती. तेव्हापासून त्या कोमात आहेत. तिच्या कुटुंबाने अमेरिकेचा व्हिसा मिळविण्यासाठी केंद्राची मदत मागितली होती. केंद्र सरकराच्या हस्तक्षेपानंतर आता नीलम शिंदेच्या कुटुंबाला अमेरिकन दूतावासाने फोन आला आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अपघात झाल्यानंतर कोमात गेलेल्या महाराष्ट्रातील साताऱ्याच्या नीलम शिंदे यांच्या कुटुंबाला अमेरिकन दूतावासाने उद्या २८ फेब्रुवारी रोजी व्हिसा मुलाखतीसाठी बोलावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी लवकर व्हिसा मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असल्याचे आश्वासन दिले आहे.
१० दिवसांपासून कोमात, कुटुंबाने केंद्र सरकारकडे मागितली मदत
३५ वर्षीय नीलम शिंदे या साताऱ्याच्या असून, कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीत चौथ्या वर्षाच्या शिक्षणासाठी गेल्या होत्या. १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी फिरायला गेलेल्या नीलम यांना एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. त्यानंतर त्या गंभीर जखमी झाल्या आणि कोमात गेल्या.
advertisement
हिट-अँड-रन असल्याचा संशय, गंभीर दुखापती
शिंदे कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, हा एक हिट-अँड-रन प्रकार असल्याचा संशय आहे. अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने नीलम यांच्या दोन्ही हात, पाय, डोके आणि छातीला गंभीर इजा झाली आहे.
कुटुंब अमेरिकेला जाणार
नीलम शिंदे यांच्या वडिलांनी केंद्र सरकारकडे अमेरिकेचा तातडीचा व्हिसा मिळवून देण्याची विनंती केली होती. सरकारच्या हस्तक्षेपानंतर आता त्यांच्या कुटुंबाला मुंबईतील अमेरिकन दूतावासात मुलाखतीसाठी बोलावले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 27, 2025 2:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साताऱ्याच्या नीलम शिंदेंचा अमेरिकेत हिट-अँड-रन अपघात; केंद्राच्या हस्तक्षेपानंतर कुटुंबाला दूतावासाकडून फोन