'लाडकी बहीण'च्या पैशांचा योग्य वापर कसा करावा? नाशिकच्या बहिणीने 'असा' केला उपयोग
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांसाठी 'लाडकी बहीण योजना' राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1,500 रूपये लाडक्या बहिणींना मिळत आहेत. अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु काही महिला या संधीचे सोने देखील करत आहेत.
महाराष्ट्रात सरकार मार्फत महिलांसाठी 'लाडकी बहीण योजना' राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1,500 रूपये लाडक्या बहिणींना मिळत आहेत. अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु काही महिला या संधीचे सोने देखील करत आहेत. नाशिकमधील निकिता बेल्हेकर या अशाच एका महिलेने दर महिन्याला येणार्या या पैशांनी स्वत:चा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पैसे येत आहेत, पण त्याचा योग्य वापर कसा करावा, याचे उत्तम उदाहरण या महिलेने इतर महिलांसमोर उभे केले आहे. तिची ही सुरुवात कशी झाली, हे आज आपण 'लोकल 18'च्या माध्यमातून जाणून घेऊया.
संपूर्ण महाराष्ट्रात 'लाडकी बहीण योजना' सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे. यामुळे अनेक गरजू महिलांना याचा फायदा होत आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे अनेक महिला काही ना काही रोजगार देखील करत आहेत. त्याच पद्धतीने नाशिकच्या निकिता बेल्हेकर या महिलेने देखील योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा योग्य वापर करून एक छोटा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
परिस्थिती बेताची असल्याने निकिता आधीपासूनच घराला हातभार लागावा म्हणून एका फूड कॅफेमध्ये नोकरी करत होती. परंतु, कोरोना काळात तिला तिची ही नोकरी देखील सोडावी लागली. कोरोना काळात सर्वत्र 'बंदी' असल्याने घर कसे चालवावे यासाठी तिने घरातून टिफिन सर्व्हिससुरू केली. दवाखाने आणि गरजेच्या ठिकाणी तिचे टिफिन जात असल्याने कोरोना काळात या व्यवसायाचा तिला मोठा हातभार लागला, असे निकिता सांगते.
advertisement
परंतु आता जशी जशी महागाई वाढत आहे, त्यानंतर टिफिन सर्व्हिसमधून होणारे उत्पन्न पुरेसे नसल्याने 'नवीन काहीतरी करूया,' या विचारातून तिने तिचा एक छोटा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. आणि याचे संपूर्ण श्रेय ती 'लाडकी बहीण योजने'तून मिळणाऱ्या पैशांना देत असते. या येणाऱ्या पैशांमुळेच तिचा हा व्यवसाय सुरू झाला असल्याचे 'लोकल १८'सोबत बोलताना निकिताने सांगितले.
advertisement
ती सांगते, "अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. बऱ्याच महिला फक्त पैसे जमा करत आहेत, परंतु या येणाऱ्या पैशांचा योग्य ठिकाणी वापर झाला, तर ते पैसे अधिक वाढून आपल्या उपयोगी येतील. यामुळे या संधीचे महिलांनी सोने करून घ्यावे," असे देखील निकिता सांगत आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Nov 09, 2025 6:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'लाडकी बहीण'च्या पैशांचा योग्य वापर कसा करावा? नाशिकच्या बहिणीने 'असा' केला उपयोग










