advertisement

'बायको नांदत नाही', बीडमध्ये तरुणाने पोलिसांना धरलं वेठीस, चक्रावून टाकणारी मागणी

Last Updated:

आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा करत आहे. अशात बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एक अजब प्रकार उघडकीस आला.

News18
News18
बीड: आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा करत आहे. अशात बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एक अजब प्रकार उघडकीस आला. इथं एका तरुणाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं आहे. त्याने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येची धमकी दिल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. "माझी पत्नी नांदत नाही, पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा," अशी मागणी करत नितीन उबाळे नावाच्या तरुणाने हा प्रकार केला. त्याच्या 'शोले' स्टाईल आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

नेमकी मागणी काय?

नितीन उबाळे हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबीक समस्येमुळे त्रस्त आहे. त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसून ती नांदायला तयार नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. आपला संसार पुन्हा सुरळीत व्हावा, यासाठी तो वारंवार प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे साकडे घालत आहे. मात्र, मागणी मान्य होत नसल्याने त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत गाठली आणि टोकाचा निर्णय घेतला.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे नितीनने आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही पहिली वेळ नाही. पत्नी नांदत नसल्याच्या कारणावरून यापूर्वी त्याने पाच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण प्रत्येक वेळी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून त्याला वाचवले होते. मात्र, आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्याने सहाव्यांदा अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
advertisement
"तुला न्याय मिळवून देऊ, तुझ्या पत्नीशी चर्चा करू, पण तू खाली उतर," अशी विनवणी पोलिसांकडून केली जात आहे. मात्र, नितीन आपल्या मागणीवर ठाम असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने बीडमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'बायको नांदत नाही', बीडमध्ये तरुणाने पोलिसांना धरलं वेठीस, चक्रावून टाकणारी मागणी
Next Article
advertisement
Explainer : प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरिकेला! पाहा नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरि
  • प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात केवळ भारताची लष्करी ताकद दिसली नाही

  • तर बदलत्या जगाचं नवं राजकारणही पाहायला मिळालं.

  • भारताने जगाला दिलेला एक मोठा 'जिओपॉलिटिकल मेसेज' होता.

View All
advertisement