Pandharpur: दहीहंडीचा खेळ झाला अन् डॉल्बीच्या आवाजात 'तो' गेला; कुणाला कळलंही नाही, पंढरपुरातील घटना

Last Updated:

डॉल्बीचा दणदणाट सुरू असताना ही व्यक्ती चक्कर येऊन पडल्याचं फारसं कुणाच्या लक्षात आलं नाही.

News18
News18
पंढरपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी मोठ्या उत्साहात राज्यभरात पार पडली. अनेक ठिकाणी थरावर थर लावून गोविंदा पथकांनी विक्रम केले. मुंबईत एकीकडे १० थरारांचा थरार पाहण्यास मिळाला तर दुसरीकडे राज्यभरातही गोविंदा पथकांनी कोणतीही कसर सोडली नाही. मात्र, या दहीहंडी उत्सवाला यंदाही गालबोट लागलं. मुंबईत २ गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर पंढरपूरमध्येही डॉल्बीच्या आवाजामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढपूरमधील शिवाजी चौकात दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. शिवाजी चौकात डॉल्बीच्या दणदणाट गोविंदा पथकांनी थरावर थर लाऊन हंडी फोडली. मात्र, या डॉल्बीच्या आवाजापायी एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  पंढरपूरच्या शिवाजी चौकात दहीहंडीच्या गोंधळात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या ही व्यक्ती अचानक चक्कर येऊन खाली पडली. डॉल्बीचा दणदणाट सुरू असताना ही व्यक्ती चक्कर येऊन पडल्याचं फारसं कुणाच्या लक्षात आलं नाही. तिथेच उपस्थितीत गोविंदा आणि स्थानिकांनी या व्यक्तीला जवळून पाहिलं असतं बेशुद्ध असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तातडीने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जखमी अवस्थेतील या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.  पण, डॉक्टरांनी तपासून या व्यक्तीला मृत घोषित केलं. अद्यापही या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.
advertisement
दरम्यान,  डॉल्बीच्या आवाजामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.  घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असून अधिक तपास केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू किंवा जखमी झाल्याची घटना नवीन नाही. याआधीही अशा अनेक घटना घडल्या होत्या. एवढंच नाहीतर डॉल्बीदरम्यान वापरण्यात आलेल्या लेजर लायटिंगमुळेही अनेकांनी आपली दृष्टी गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या या व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम पंढरपूर पोलीस करत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pandharpur: दहीहंडीचा खेळ झाला अन् डॉल्बीच्या आवाजात 'तो' गेला; कुणाला कळलंही नाही, पंढरपुरातील घटना
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement