Crime News : माणुसकी ओशाळली! 'मीठ आणा, पेट्रोल घ्या..' धाराशिवमध्ये तरुणाला मरेपर्यंत मारहाण, कारण आलं समोर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Crime News : किरकोळ कारणातून तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली. यात तरुणाचा मृत्यू झाला आहे.
धाराशिव, (बालाजी निरफळ, प्रतिनिधी) : मोबाईल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने या तरुणाला मरुस्तोवर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या मारहाणाची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोबाईल चोरीच्या संशायातून तरुणाची हत्या
मोबाईल चोरीच्या संशयावरून चार ते पाच तरुणांनी अमर लोमटे या तरुणाला अमानुषपणे मारहाण केली. ही घटना जिल्ह्यातील ढोकी गावात घडली आहे. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला असून या मृत्यू प्रकरणात चार आरोपी विरोधात ढोकी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. अगदी जनावरांना मारतात तसे या तरुणाला मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. अमर लोमटे याला उसाने, काठीने बेदम मारहाण करण्यात आली. अमरचे वडील राजेंद्र लोमटे यांच्या फिर्यादीवरून अक्षय इंगळे, संतोष वाघमारे, अकबर शेख, शंकर चौधरी या चार आरोपींविरोधात ढोकी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ढोकी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
advertisement
माणुसकी ओशाळली
अमर लोमटे या तरुणाला ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली आहे. ते पाहून कोणच्याही तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते. व्हिडीओमध्ये अमरची पाठीवर काळेनिळे व्रण दिसत आहे. तो अर्धामेला झालेला असतानाही टोळक्याची मारहाण सुरुच होती. त्याला शिव्यांची लाखोली वाहिली जात होती. त्याच्या पाठिवर मीठ आणि पेट्रोल टाकण्याचं बोललं जात होतं. रात्रीच्या अंधारात बांधून अमरला मारहाण करण्यात आली. कपडे फाटेस्तोवर तरुणाला मारहाण केली. तो सोडण्याची विनवणी करतानाही, आरोपींच्या पाषणा हृदयाला पाझर फुटला नाही. कळस म्हणजे या सर्व घटनेचा मोबाईलमध्ये चित्रिकरण केलं जात होतं. सर्वजण विनोद करत होते. त्याला शिव्याशाप देत होते.
advertisement
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे पोलीस आता काय करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
February 10, 2024 6:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/उस्मानाबाद/
Crime News : माणुसकी ओशाळली! 'मीठ आणा, पेट्रोल घ्या..' धाराशिवमध्ये तरुणाला मरेपर्यंत मारहाण, कारण आलं समोर