Uddhav Thackeray : 'माझी शिवसेना नकली तर तुम्ही..' ठाकरेंचा PM मोदी-अमित शहा जोडीवर बोचरी टीका
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Uddhav Thackeray : नकली शिवसेना या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.
धाराशिव, (बालाजी निरफळ, प्रतिनिधी) : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी ठाकरे यांनी थेट मोदी-शहा जोडीवर तोफ डागली आहे. मोदी साहेब तुम्ही जर माझ्या संकटात धावून येत असाल तर मीही तुमच्या संकटात धावून येईल पण तुम्ही आता चुकीच्या पद्धतीने राज्यावर येत आहात ते मला मान्य नाही, असं वक्तव्य धाराशिव येथील सभेत बोलताना केलं आहे.
ठाकरेंची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर टीका
चार दिवसांपूर्वी पंतप्रधान एका मुलाखतीत म्हणले होते की उद्धव ठाकरे आजारी असताना मी त्यांच्या संकटात बाळासाहेबांची चिरंजीव आहेत म्हणून संकटात उभा राहिलो. पण तुम्ही माझी चौकशी करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमचे गद्दार मुख्यमंत्री शिंदे यांना हे माहीत नव्हतं का? एवढं आजारी असताना देखील ते मला सरकारच्या खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत होते, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. तर अमित शहा राज्यात येऊन माजी शिवसेना नकली असल्याचं म्हणतात तुम्ही जर शिवसैनिक आणि शिवसेनेला नकली म्हणत असाल तर तुम्ही बेअकली मी म्हणेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी नकली शिवसेनेला केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेत उत्तर दिले आहे.
advertisement
मी कालच कोकणात जाऊन आलो, ज्यांनी मला कोकणात येऊन दाखवा असे आव्हान दिले होते. तिथे सभा घेऊन आलो. ते गद्दार त्यांना कोकणातली जनताच काढणार माझी सुद्धा गरज लागणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. एवढेच नाही तर अमित शहा देखील आज त्या ठिकाणी सभा घेत मला आव्हान देत असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेत बोलताना धाराशिव येथे केले आहे.
advertisement
तुळजाभवानीचा विसर पंतप्रधानांना पडला : उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी मथुरेत जाऊन समुद्राच्या तळापर्यंत जाऊन आले. पण ते तुळजापुरात आले त्यांना आई तुळजाभवानीचा विसर पडला. त्यांनी तुळजाभवानीचे साधे दर्शन देखील घेतले नाही. एवढेच नाही तर तुळजाभवानी बद्दल दोन मिनिट देखील ते बोलले नाहीत. त्यांना देवीचा विसर पडला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. माझं चिन्ह मशाल आहे, जय भवानी जय शिवाजी, आई तुळजाभवानीची घोषणा ही मशाल तुळजाभवानीची म्हणून माझं चिन्ह किंवा वाक्य काढा असं निवडणूक आयोग सांगत नोटीसा देतं. पण ते मी काढणार नाही उद्या आमचं सरकार आल्यावर त्यांना बघून घेईल असा देखील दम उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे तेय ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ धाराशिव येथील जाहीर सभेत बोलत होते
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
May 04, 2024 10:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/उस्मानाबाद/
Uddhav Thackeray : 'माझी शिवसेना नकली तर तुम्ही..' ठाकरेंचा PM मोदी-अमित शहा जोडीवर बोचरी टीका