advertisement

कराड जेलमध्ये, पण शहरात वाल्मिकच्या मुलांचं कृत्य समोर, ज्ञानेश्वरी मुंडेंची पोलिसांकडे धाव

Last Updated:

 ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांकडे एक अर्ज केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

(mahadev munde case)
(mahadev munde case)
बीड : बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा दोन वर्षांपूर्वी धारदार शास्त्र शस्त्राचे वार करून खून झाला होता. त्या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असताना आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वाल्मीक कराडच्या दोन्ही मुलापासून आमच्या जीविताला धोका असल्याची धक्कादायक माहिती महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे सुरक्षेसाठी अर्ज केला आहे. या पत्रकार वाल्मिकची मुलं  सुशील कराड आणि श्री गणेश कराड यांच्या नावाचा उल्लेख आहे. एवढंच नाहीतर अज्ञात तरुणाकडून महादेव मुंडे यांच्या मुलाला शिवीगाळ करण्याात आली आणि हातातील कडे देखील फेकून मारले, असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांकडे एक अर्ज केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपासात वाल्मिक कराड याच्या टोळीतील काही लोकांना ताब्यात घेतले असून यामुळे वाल्मिक कराड याची मुलं सुशील कराड आणि श्रीगणेश कराड यांच्याकडून माझ्या परिवारातील सदस्य दत्तात्रय मुंडे, अशोक मुंडे, प्रणव मुंडे, पंकज मुंडे, प्रवीण मुंडे आणि माझा भाऊ सतीश फड, वडील भगवान फड यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
advertisement
माझ्या परिवारातील या सदस्यांबाबत काही अनपेक्षित घटना घडल्यास सुशील वाल्मीक कराड आणि श्रीगणेश वाल्मीक कराड हे जबाबदार राहतील, असा तक्रार अर्ज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षकांना दिला असून आता यावर पोलीस अधीक्षकांनी काय उपायोजना केल्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांच्या नार्को टेस्ट केल्याची माहिती समोर आली होती. त्या पाठोपाठ आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अशा पद्धतीने अर्ज दिल्याने या प्रकरणाशी वाल्मीक कराड आणि त्याच्या मुलांचा काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून एसआयटीच्या तपासातूनच यातील सत्य समोर येऊ शकणार आहे.
advertisement
अज्ञात तरुणांनी मुंडेंच्या मुलांना केली शिवीगाळ 
तर दुसरीकडे, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलाला दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी मुलाने काहीही कारण नसताना शिवीगाळ केली. तसंच हातातील कडे फेकून मारले होते. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुंडे कुटुंबीयांनी या प्रकरणाचा तपास करणारे पंकज कुमावत यांना संपर्क साधला तसंच पोलीस अधीक्षकांना देखील अर्ज दिला आहे. याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे यांना देखील याबाबतची माहिती दिली असून त्यांनी या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीते हा देखील फरार आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड हे या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे गोट्या गीते याच्यापासून परिवाराला तसंच फड यांना धोका होऊ शकतो, अशी भीती देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कराड जेलमध्ये, पण शहरात वाल्मिकच्या मुलांचं कृत्य समोर, ज्ञानेश्वरी मुंडेंची पोलिसांकडे धाव
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement