advertisement

पालघर आरोपी ते तुषार आपटे, हेच का तुमचं हिंदुत्व? उद्धव ठाकरेंनी भाजपचं सगळंच काढलं

Last Updated:

अक्षय शिंदेंनं तोंड उघडे नव्हे म्हणून त्याचा एन्काऊंटर झाला. पण पुढे तुषार आपटेचं काय झालं, अटक झाली की नाही काहीच माहिती नव्हती. आता अचानक भाजपने स्वीकृत उमेदवारी दिली

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर :  "मुलींवर अत्याचार करणारा सहआरोपी आहे, त्याने आमचे उमेदवार निवडून दिले म्हणून स्वीकृत उमेदवारी देतात. विकृत माणसाला तुम्ही उमेदवारी देतात, तुम्हाला विकृती चालते, हेच तुमचं हिंदूत्व का? पालघर हत्याकांडमध्ये जो आरोपी आहे, त्यााला भाजपने पक्षात प्रवेश दिला होता. हेच का त्यांचं हिंदुत्व आहे. तुम्हाला कोणीही चालतंय, भ्रष्टाचारी बलात्कारी, खुनी सगळे चालतात. भाजपचं वाक्य होतं राष्ट्र प्रथम, आता गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला.
advertisement
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची विराट अशी सभा पार पडली. यावेळी अंबरनाथ बलात्कार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपने स्वीकृत उमेदवारी दिली होती, त्या मुद्यालाा हात घालत उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलंच फैलावर घेतलं.
मुलीवर बलात्कार करणारा विकृत तुम्हाला चालतो का?
काल नाशिकमध्ये सभा झाली, आता विजयाच्या सभेला राज ठाकरे यांना घेऊन येईन. नाशिकमध्ये तेच, सोलापूर, कल्याण डोंबिवलीमध्ये तीच परिस्थिती आहे. यांच्याकडे उमेदवार नाही. एक दीड वर्षांपासून एका शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला होता. अक्षय शिंदेला पकडलं होतं, जलद कोर्टात न्याय होईल असं वाटत होतं. पण, अक्षय शिंदेंचा एन्काउंटर झाला. या प्रकरणात सह आरोपी हा तुषार आपटे होता. त्याला भाजपने स्वीकृत उमेदवारी दिली. अक्षय शिंदेंनं तोंड उघडे नव्हे म्हणून त्याचा एन्काऊंटर झाला. पण पुढे तुषार आपटेचं काय झालं, अटक झाली की नाही काहीच माहिती नव्हती. आता अचानक भाजपने स्वीकृत उमेदवारी दिली. हे त्यांचं हिंदुत्व आहे. मुलींवर अत्याचार करणारा सहआरोपी आहे, त्याने आमचे उमेदवार निवडून दिले म्हणून स्वीकृत उमेदवारी देतात. विकृत माणसाला तुम्ही उमेदवारी देतात, तुम्हाला विकृती चालते, हेच तुमचं हिंदूत्व का?
advertisement
 भाजपचं वाक्य होतं राष्ट्र प्रथम, आता गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम
पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली होती, त्यावेळी लगेच कारवाई करून, सगळ्यांना अटक केली होती, कुणालाही सोडलं नाही. पण भाजपवाल्यांनी उद्धव ठाकरेंनी काय केली अशी मेवाभाऊने बोंब मारली होती. आता याच मेवाभाऊने हत्याकांडमध्ये जो आरोपी आहे, त्यााला भाजपने पक्षात प्रवेश दिला होता. हेच का त्यांचा हिंदुत्व आहे. तुम्हाला कोणीही चालतंय, भ्रष्टाचारी बलात्कारी, खुनी सगळे चालतात. भाजपचं वाक्य होतं राष्ट्र प्रथम, आता गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम हे घोष वाक्य झालं आहे, अशी टीकाही ठाकरेंनी केली.
advertisement
अजितदादांना मंत्रिमंडळातून काढून दाखवा नाहीतर...
अजित पवार सांगत आहेत, 70 हजार कोटी घोटाळा केला ते यांच्यासोबत सत्तेत आहे. याबद्दल विचारले तर फडणवीस सांगतात केस सुरू आहे. तुम्ही चालू आहात केस माहिती नाही. गाडीभर पुरावे तुम्ही घेऊन गेले होते त्याचे काम झाले.  पुरावे मध्ये तथ्य असेल तर अजित पवार यांना खुर्चीवरून काढले पाहिजे, आणि पुरावे कुठे असेल तर त्यांनी अजित पवारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा नाहीतर अजित पवारांची माफी मागायला पाहिजे. तुतोंडी गांडूळासारखे करू नका, असं आव्हानच ठाकरेंनी फडणवीसांना दिलं.
advertisement
उद्धव ठाकरेंचं  फडणवीसांना चॅलेंज
"संभाजीनगरला वर्षातून फक्त 44 दिवस पाणी येते. 44 दिवस जे पाणी येते ते मुस्लिम आणि हिंदूचे घर बघून येते का?  आमच्यामध्ये तुम्ही का आग लावता आग लावल्यावर पाणी पण नाही विझवायला.  फडणवीस यांना मी आव्हान दिले आहे की, मला एक निवडणूक दाखवा की, त्यांनी केली कामे दाखवा. भाजपने केलेली काम दाखवली आहे. एक भाषण दाखवा  हिदू मुस्लिम तुम्ही न करता बोलला आहात, हे दाखवा. मी एक लाख देतो. केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका तुमच्याकडे आहे. तरीही निवडणुका आल्या ही मुंबईत बांगलादेशी घुसले आहे, हे अपयश अमित शहा यांचं आहे,  अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
advertisement
अहमदाबादचं कर्नावती करून दाखवा
शिवसेना आणि भाजपची सत्ता होती, आम्ही तुमच्या ताटात जेवलो, बाळासाहेबांनी तुम्हाला दोन घास खाऊ घातले नाहीतर कुपोषणाने तुमच्या आज मृत्यू झाला असता.  या संभाजीनगरचं नामकरण मी केलं आहे. हे मी अभिमानाने सांगत आहे. माझी ती शेवटची बैठक होती. आम्ही जर संभाजीनगर केलं नसतं, तर यांच्यामध्ये हिंमत नव्हती. जर इतकीच हिंमत असेल तर अहमदाबादचं कर्नावती करून दाखवा. जा तुम्हाला हे आव्हान आहे. अमित शहा यांचा हा मतदारसंघ आहे.  आमच्या अंगावर येतात हिंदुत्व हिंदुत्व करून. तुमच्या शहराचं नामकरण करून दाखवा, शेवटच्या घरात झाकून पाहायचं आणि दुसऱ्या घरात आग लावायचं काम सुरू आहे.
advertisement
माझी थट्टा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना पैसे द्या
जाऊ तिथे खाऊ हे यांचे काम सुरू आहे. त्यांनी मला विकासावर बोलून दाखवा असे आव्हान दिले, पण इथे विकास कोणी केला ते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.  रस्ते सुधारले होते कचऱ्याचा प्रश्न दूर केला होता. पाणी योजना घेऊन आलो होतो. हा विकास नव्हता का? माझी थट्टा केल्यापेक्षा शेतकऱ्यांचे पैसे द्या, १ रुपयांमध्ये पिक विमा देताय, आधी शेतकऱ्यांचं देणं आहे. शेतकऱ्यांना मदत द्या. फोन पेवर दोन हजार रुपये देणार असे कळले. याच्यावर निवडणूक आयोगाने पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. जर ते सच्चे असतील ते पण जर तिकडे मुजरा मारत असतील. काय अपेक्षा ठेवायची.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पालघर आरोपी ते तुषार आपटे, हेच का तुमचं हिंदुत्व? उद्धव ठाकरेंनी भाजपचं सगळंच काढलं
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement