Crime : ऑफिसमध्ये सतत किरकिर..! टोकाची भांडणं अन् टीम मेंबरला जीवानिशी संपवला, पाण्याच्या टाकीत फेकली बॉडी, पण एक चूक केली
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Palghar Crime : अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव 27 वर्षीय आसाराम राकेश असे असून, त्याने राकेश सिंह नावाच्या आपल्या सहकाऱ्याची निर्घृण हत्या केली आहे.
Palghar Crime News : पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात एका धक्कादायक हत्येची घटना उघडकीस आली असून, एका तरुणाने किरकोळ वादातून आपल्याच सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याचा जीव घेऊन त्याचा मृतदेह कंपनीच्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला. ही थरारक घटना सोमवारी एका औद्योगिक क्षेत्रात घडली असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव 27 वर्षीय आसाराम राकेश असे असून, त्याने राकेश सिंह नावाच्या आपल्या सहकाऱ्याची निर्घृण हत्या केली आहे.
हल्ल्यानंतर राकेशचा जागीच मृत्यू
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकाच कंपनीत काम करणाऱ्या या दोन तरुणांमध्ये कामाच्या ठिकाणी कोणत्या तरी कारणावरून जोरदार भांडण झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात आसारामने लोहेच्या रॉडने राकेशवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर राकेशचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा हा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आसारामने मृतदेह कंपनीच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकला आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
advertisement
कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना काहीतरी संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली. वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढला आणि तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
advertisement
कलम 103 नुसार गुन्हा दाखल
पालघर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणावर अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, "घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने हालचाली करून आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिताच्या कलम 103 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे." हा वाद नेमका कशामुळे झाला आणि यात कोणाचे चिथावणीखोर वागणे होते का, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.
view commentsLocation :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 1:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Crime : ऑफिसमध्ये सतत किरकिर..! टोकाची भांडणं अन् टीम मेंबरला जीवानिशी संपवला, पाण्याच्या टाकीत फेकली बॉडी, पण एक चूक केली









